राय एटीएम मशिन चोरी प्रकरणात आंतरराज्य टोळीचा हात

By ऑनलाइन लोकमत | Published: November 13, 2019 07:51 PM2019-11-13T19:51:35+5:302019-11-13T19:51:50+5:30

गोवा पोलिसांचा निष्कर्ष; अधिक माहितीसाठी हुबळी पोलिसांशी संपर्क

Inter Gangs Involvement Suspected Raia Atm Theeft Attempt | राय एटीएम मशिन चोरी प्रकरणात आंतरराज्य टोळीचा हात

राय एटीएम मशिन चोरी प्रकरणात आंतरराज्य टोळीचा हात

Next

 

मडगाव:  राय येथील सेंट्रल बँकमध्ये एटीएम मशिन फोडण्याचा जो प्रयत्न झाला त्यामागे आंतरराज्य टोळीचा हात असण्याची शक्यता व्यक्त केली जात असून हल्ली अशाच प्रकारच्या एटीएम मशिन्स चोरण्याच्या घटना हुबळीतही झाल्याने गोवा पोलीस अधिक माहिती मिळविण्यासाठी हुबळी पोलिसांच्या संपर्कात आहेत.

दक्षिण गोव्याचे पोलीस अधीक्षक अरविंद गावस यांनी दिलेल्या माहितीप्रमाणो, या एटीएम मशिनचा चोरीचा प्रयत्न चौघांकडून झाल्याचे सीसीटीव्ही कॅमे:यांच्या फुटेजवरुन स्पष्ट झाले आहे. त्यातील तीन व्यक्ती तोंडावर बुरखा घालून आल्या होत्या तर एक व्यक्ती बिना बुरखाधारी असल्याचे दिसून आले आहे. या बिना बुरखाधारी आरोपीचा शोध घेता येणो शक्य आहे का हे सध्या तपासून पाहिले जात असल्याचे त्यांनी सांगितले.

याच वर्षात गोव्यात अशाप्रकारच्या एटीएम मशिन चोरीच्या पाच घटना घडल्या आहेत. त्यापैकी तीन प्रयत्नांना चोरटय़ांना पैसे चोरण्यास यश आले नव्हते. मात्र कोलवाळ येथे जुलै महिन्यात एचडीएफसी बँकेचे एटीएम मशिन चोरुन नेऊन त्यातील 11 लाख रुपये पळविले होते.  गेल्या ऑक्टोबर महिन्यात करमळी येथे एचडीएफसी बँकेचेच एटीएम मशिन उभारुन नेत 20 लाख चोरले होते. राय येथेही मशिन फोडण्याचा प्रयत्न अयशस्वी झाल्यानंतर ते उचलून नेता येते का याचा प्रयत्न झाला होता. मात्र ते शक्य नसल्याने चोरटय़ांनी ती मशिन तिथेच टाकून पळ काढला होता.

अधीक्षक गावस म्हणाले, ज्या पद्धतीने गोव्यात एटीएम मशिनच्या चो:या झाल्या आहेत त्यातील कार्यपद्धती गोव्यातील टोळ्यांची नसून यात आंतरराज्य टोळी सक्रीय असावी असे वाटते. हल्लीच हुबळी येथे अशाप्रकारच्या चो:यात काहीजणांना अटक झाली होती. त्यामुळेच आम्ही हुबळी पोलिसांच्या संपर्कात आहोत असे त्यांनी सांगितले.

Web Title: Inter Gangs Involvement Suspected Raia Atm Theeft Attempt

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.