शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे हादरले! टीव्ही बंद करण्यावरुन वाद, बापाची मुलाकडून हत्या; कोथरुडमधील घटना
2
मला पुरस्कार द्या...! पठ्ठ्याने फास्टॅग पास आल्यापासून २५ दिवसांत ११,००० किमी थार चालविली, वाचले एवढे रुपये...
3
BSNL ने लॉन्च केली eSIM सेवा: आता फिजिकल सिम कार्डशिवाय करा कॉल आणि वापरा इंटरनेट!
4
'IIT कानपूरने माझ्या मुलाचा घास घेतला'; इंजिनिअरिंग करणाऱ्या धीरजचा रूममध्ये मिळाला मृतदेह, बापाचा आक्रोश
5
जर्मनीतील म्युनिक विमानतळावर ड्रोन दिसला, १७ उड्डाणे रद्द; युरोपमध्ये घबराट पसरली
6
‘शटडाऊन’च्या पहिल्याच दिवशी अमेरिकेत संकट; देशातील अनेक महत्त्वाची पर्यटनस्थळे तात्पुरती बंद
7
'युरोपने चिथावणी दिली तर योग्य उत्तर मिळेल,तेल खरेदीबाबत भारत अमेरिकेच्या दबावाला झुकणार नाही';पुतिन यांचा स्पष्ट इशारा
8
आजचे राशीभविष्य- ०३ ऑक्टोबर २०२५, धनलाभ होईल, प्रतिस्पर्ध्यांवर मात करू शकाल
9
‘बाबा’कडे तसले टॉय, पॉर्न सीडी, अश्लील चॅट अन्... चैतन्यानंदच्या चौकशीतून धक्कादायक माहिती बाहेर
10
Kantara Chapter 1: प्रदर्शित होताच अख्खं मार्केट खाल्लं! 'कांतारा चॅप्टर १'चं बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
11
श्वासात, ध्यासात गांधी विचार जगलेला स्वातंत्र्य संग्रामातील तारा निखळला; ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी डॉ. जी. जी. पारीख कालवश
12
सर्व राज्यांत मतदार यादीतून हटवणार मृत व्यक्तींची नावे; जन्म-मृत्यू नोंदणी कार्यालयाचा डेटा निवडणूक यंत्रणेशी जोडणार
13
‘अनैतिकते’मुळे अफगाणमध्ये ब्लॅकआउट! इंटरनेटबंदीमागे तालिबानचा नेमका हेतू काय?
14
तेजीचे दिवस; अर्थव्यवस्थेची मरगळ झटकली, नोकऱ्या आणि गिग कामगारांसाठी 'अच्छे दिन' का?
15
सोने खरेदीची लगीनघाई; दसऱ्याच्या मुहूर्तावर मुंबईतील बाजारात संध्याकाळी तेजी; चांदी फॉर्मात
16
शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीच्या आमिषाने कोट्यवधींचा गंडा, ‘लिंक’पासून सावधान; खात्री करून गुंतवणूक करा
17
विधान भवनातील मारहाण प्रकरण तपासाला स्थगिती; मरिन लाइन्स पोलिसांना उच्च न्यायालयाचे आदेश
18
हिंसा हे प्रश्नांचे उत्तर नाही, लोकशाहीतूनच आमूलाग्र बदल शक्य आहे : सरसंघचालक डॉ. मोहन भागवत
19
संकटात जो घरी बसतो तो कसला आला शिवसैनिक? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उद्धव ठाकरेंवर टीका
20
संघ मेहनतीला लागलेले भाजप हे विषारी फळच! उद्धव ठाकरे यांचा दसरा मेळाव्यात घणाघात

गोव्यात मातृभाषेतून प्राथमिक शिक्षणाच्या बाबतीत उदासीनता 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2018 14:44 IST

५८ टक्के विद्यार्थी घेताहेत इंग्रजी माध्यमातून शिक्षण

पणजी : गोव्यात कोकणी किंवा मराठी मातृभाषेतून प्राथमिक शिक्षण घेण्याच्या बाबतीत उदासीनता दिसून येत असून तब्बल 58% विद्यार्थी इंग्रजी माध्यमातून शिक्षण घेत असल्याची माहिती उघड झाली आहे. शिक्षणमंत्री या नात्याने मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी विधानसभेत ही माहिती दिली. पर्रीकर म्हणाले की, तब्बल ९२  हजार विद्यार्थी प्राथमिक शिक्षण घेत आहेत त्यातील ५६  हजार इंग्रजी माध्यमातून शिकत आहेत. प्रादेशिक भाषांमधून शिक्षणासाठी सरकार प्रोत्साहन देत आहे. त्यासाठी प्रति विद्यार्थी चारशे रुपये आर्थिक अनुदानाची योजना ही काढली आहे. मातृभाषेतून प्राथमिक शिक्षण हा जागतिक सिद्धांत आहे, असे प्रतिपादनही त्यांनी केले.

प्राथमिक शाळांच्या माध्यमाचा प्रश्न काही आमदारांनी विधानसभेत उपस्थित केला होता. त्यावर उत्तर देताना नव्या शाळांना यापुढे परवानगी दिली जाणार नाही त्यामुळे आता हा प्रश्न उरलेला नाही,  असे पर्रीकर म्हणाले. इंग्रजी माध्यमाच्या शाळांना अनुदान चालू ठेवण्यास काही आमदारांचा विरोध आहे तर हे अनुदान चालूच राहील, अशी भूमिका सरकारने घेतली आहे. प्राथमिक शाळांच्या माध्यमांचा प्रश्न प्रलंबित आहे. विधेयक चिकित्सा समितीकडे आहे. सरकार हा प्रश्न अजून सोडवू शकलेले नाही. इंग्रजी माध्यमांच्या शाळांचे अनुदान बंद करावे, अशी मागणी घेऊन भारतीय भाषा सुरक्षा मंच लढा देत आहे.

दरम्यान, सायबर एज योजनेखाली अकरावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या लॅपटॉपच्या याबाबतीत काही सुधारणा घडवून आणण्यात येणार असून यापुढे लॅपटॉप शाळेच्या प्रयोगशाळेतच राहतील आणि लॅपटॉपचा वापर शाळेतच होईल. विद्यार्थ्यांना लॅपटॉपचा मालकी हक्क मिळणार नाही. या योजनेखाली मिळालेले लॅपटॉप विद्यार्थी परस्पर बाहेर विकतात, असे आढळून आल्याने या योजनेत दुरुस्ती केली जाणार आहे. शिक्षक भरतीसाठी यापुढे पात्रता परीक्षा लागू केली जाईल. सर्व शिक्षा अभियान अंतर्गत घेतलेल्या शिक्षकांना सेवेत कायम करावे, अशी मागणी विरोधी पक्षनेते बाबू कवळेकर यांच्यासह काही आमदारांनी केली असता विषय वर्षअखेरपर्यंत निकालात काढण्याची ग्वाही त्यांनी दिली.

दरम्यान, शालेय अभ्यासक्रमात 25 टक्के स्थानिक इतिहास लागू केला जाईल. राज्यातील ऐतिहासिक किल्ले तसेच इतर गोष्टींचा यात समावेश असेल. तसेच 1962 चे युद्ध 1971 चे युद्ध व कारगिल युद्धाचा ही समावेश असेल, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलेइयत्ता आठवीपर्यंत सर्व विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करण्याची जी योजना आहे, त्याला अनेक आमदारानी आक्षेप घेतला. त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री म्हणाले की, 'शिक्षण हक्क कायद्यातील 2017 च्या दुरुस्तीमुळे लवकरच मार्गदर्शक तत्त्वे केंद्र सरकार कडून प्राप्त होणार असून त्यानुसार पाचवी व आठवीच्या विद्यार्थ्यांना ठराविक परीक्षा घेतल्या जातील. या मार्गदर्शक तत्त्वांची आम्ही वाट पहात आहोत.'विशेष गरजा असलेल्या विद्यार्थ्यांच्या शाळांसाठी ऑगस्ट अखेरपर्यंत नवी योजना येईल. शालेय अभ्यासक्रमात वाहतूक व रस्ता सुरक्षा,  कचरा व्यवस्थापन, सांडपाणी व्यवस्थापन व वैयक्तिक आरोग्य हे तीन वेगवेगळ्या स्तरावरील विषय लागू केले जातील. याशिवाय योग प्रशिक्षणही दिले जाईल. यावर्षी 108 शाळांमध्ये हे अभ्यासक्रम लागू होतील, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :Studentविद्यार्थीTeacherशिक्षकgoaगोवा