गोव्याच्या पाकिस्तानी जावयाला भारत प्रवेश बंद; व्हिसा उल्लंघनासाठी कारवाई 

By ऑनलाइन लोकमत | Published: January 15, 2020 09:22 PM2020-01-15T21:22:49+5:302020-01-15T21:23:49+5:30

पाकिस्तानी नागरिकाला व्हिसा उल्लंघनासाठी त्याच्या देशात रवानगी केली आहे.

India's entry into Pakistan from Goa closed; Action for visa violation | गोव्याच्या पाकिस्तानी जावयाला भारत प्रवेश बंद; व्हिसा उल्लंघनासाठी कारवाई 

गोव्याच्या पाकिस्तानी जावयाला भारत प्रवेश बंद; व्हिसा उल्लंघनासाठी कारवाई 

googlenewsNext

पणजी: गोव्याचा जावई असलेल्या पाकिस्तानी नागरिकाला व्हिसा उल्लंघनासाठी त्याच्या देशात रवानगी केली आहे. पुन्हा त्याला भारताचा व्हिसा मिळू नये यासाठी काळ्या यादीत टाकण्यात आले आहे. या कारवाईमुळे काही वर्षे त्याला भारत प्रवेश बंद झाला आहे
मह्मद फैजल असे या पाकिस्तानी नागरिकाचे नाव असून त्याचा गोव्यात म्हापसा येथील शायना नावाच्या एका मुस्लीम युवतीशी विवाह झाला होता. तो १८ जुलै २०१९ रोजी गोव्यात आला होता.

भारतात येणाऱ्या पाकिस्तानी नागरिकाला भारतात आल्यानंतर २४ तासात विदेश विभागाला त्याची माहिती देणे हे व्हिसा नियमानुसार बंधनकारक असते. याच अटीवर त्यांना व्हिसा दिला जातो. फैजल हा १८ जुलै रोजी गोव्यात आला होता, त्यामुळे २४ तासात त्याने विदेश विभागात नोंदणी करणे आवश्यक होते. परंतु तो विदेश विभागाकडे गेला २१ जुलै रोजी. म्हणजेच ३ दिवसांनी तो विदेश विभागात नोंदणीसाठी आला. 

व्हिसा नियामाचा त्याने भंग केल्यामुळे त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात आल्याची माहिती गोव्याचे विदेश विभागाचे अधिक्षक बॉस्को जॉर्ज यांनी दिली. फैजलला दंड ठोठावण्यात आला. तसेच त्याची पाकिस्तानमध्ये रवानगी करण्यात आली. या कारवाईबरोबरच त्याला काळ््या यादीतही टाकण्यात आले आहे. या कारवाईमुळे त्याला काही वर्षे भारत प्रवेश बंद झाला आहे. त्याची पत्नी गोमंतकीय असल्यामुळे ती पाकिस्तानमधून भारतात येवू शकते, परंतु पतीला यायला मिळणार नाही. शायना व फैजल दोघीही आखाती देशात कामाला होती व तिथेच त्यांचा विवाह झाला होता. 

व्हिसा नियमाचे उल्लंघन करणाºयांना  काळ्या यादीत टाकण्याची कारवाई  केली जाते. गोव्यात त्याची अंमलबजावणी अत्यंत काटेकोरपणे केली जात असल्याची माहिती बॉस्को जॉर्ज यांनी दिली. २०१९ वर्षात एकूण ५५ विदेशी नागरिकांना व्हिसा उल्लंघनासाठी काळ्या यादीत टाकण्यात आली. काळ्या यादीत टाकण्यात आलल्यात सर्वात अधिक १४ नागरीक हे युगांडाचे आहेत. त्यानंतर तांझानिया ९, रसिया ८, ब्रिटीश ५, युक्रेन ३ तर इतर देशातील ३३ नागरिकांचा समावेश आहे

Web Title: India's entry into Pakistan from Goa closed; Action for visa violation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.