शहरं
Join us  
Trending Stories
1
"रस्ता ब्लॉक होणारच, थोडा त्रासही होतोच, पण..."; 'त्या' मुद्द्यावर गिरीश महाजनांची प्रतिक्रिया
2
ट्रम्प यांच्या युद्धविरामाच्या घोषणेनंतर काही वेळातच युद्धाची ठिणगी! होर्मुझमध्ये अंदाधुंद फायरिंग
3
‘आपले सर्व शेजारी चांगले, फक्त एक...', राजनाथ सिंह यांचा जर्मनीतून पाकिस्तानवर निशाणा
4
Top Marathi News LIVE Updates:खरातच्या अकाउंटला बोगस खात्यांतून कोट्यवधी रुपये ट्रान्सफर
5
“धडा शिकवायची हीच योग्य वेळ”; रिक्षावाल्यांना मराठी अनिवार्य निर्णय, मनसेचा नवा उपक्रम
6
Raja Shivaji: सलमान खान ते विद्या बालन! रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'मध्ये बॉलिवूड कलाकारांची तगडी फौज
7
Health Care Tips: का वाढतो उन्हाळ्यात हार्ट अटॅकचा धोका? जाणून घ्या कारणं आणि बचावाचे उपाय!
8
Vidhan Parishad: विधान परिषद उमेदवार निवडताना भाजपची होणार तारेवरची कसरत 
9
ऑनलाईन ५० iPhone ची ऑर्डर, पण घरी आला नाही एकही फोन; ३५ लाखांची मोठी फसवणूक
10
“भारत कधीही दहशतवादासमोर झुकणार नाही”; पहलगाम वर्षपूर्तीला PM मोदींचा शत्रूंना स्पष्ट संदेश
11
अहमदाबाद विमान अपघातात पत्नी आणि मुलीला गमावलेल्या भारतीय व्यक्तीला धक्का, ब्रिटन सोडण्याचे आदेश
12
भयंकर ! वर्गाबाहेर पडताच झाला वाद, आठवीमधील विद्यार्थ्याने दुसऱ्याच्या डोळ्यात खुपसला कंपास
13
बस्स.. आता संबंध संपला..! विराट कोहलीने घेतला मोठा निर्णय, कोर्टाच्या आदेशाने 'विषय संपला'
14
₹५०० रुपयांची नोट छपण्यासाठी किती येतो खर्च, कुठे छापल्या जातात नोटा; RBIनं दिली रंजक माहिती
15
STचे मोठे पाऊल! अभिनेता रितेश देशमुख-जेनेलिया देशमुख होणार ब्रँड अँबेसेडर, ५ वर्षांसाठी करार
16
"५० हजार द्यायचा, तरीही माझ्या मुलाला मारलं"; निळ्या ड्रममध्ये टाकलेल्या सौरभच्या आईचा टाहो
17
सोन्या-चांदीच्या दरात मोठी वाढ; आणखी महागणार का Gold? पाहा काय आहेत आजचे लेटेस्ट दर?
18
Ashok Kharat : भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणी मोठ्या हॉटेल व्यावसायिकाची तब्बल ६ तास चौकशी
19
शांतता चर्चेसाठी प्रयत्न, मुनीर यांचा ट्रम्प यांना फोन; म्हणाले, “होर्मुझची नाकेबंदी...”
20
Ganga Saptami 2026: सौभाग्याची 'गंगा' येईल तुमच्या दारी! २३ एप्रिल रोजी गंगा सप्तमीला करा 'हे' विशेष विधी
Daily Top 2Weekly Top 5

सात पालिकांच्या प्रभागांत वाढ

By admin | Updated: June 12, 2015 00:48 IST

पणजी : सात नगरपालिकांच्या प्रभाग संख्येत सरकारने वाढ केली आहे. त्याबाबतचा आदेश गुरुवारी नगर विकास खात्याचे संचालक एल्वीस गोम्स यांनी जारी केला आहे

पणजी : सात नगरपालिकांच्या प्रभाग संख्येत सरकारने वाढ केली आहे. त्याबाबतचा आदेश गुरुवारी नगर विकास खात्याचे संचालक एल्वीस गोम्स यांनी जारी केला आहे. एकूण अकरा पालिकांच्या निवडणुका येत्या दि. २५ आॅक्टोबरला घेण्याची सूचना राज्य निवडणूक आयोगाने सरकारला केली आहे. नगरसेवकांची संख्या आता बावीसने वाढणार आहे.वाळपई, पेडणे, सांगे, काणकोण या चार नगरपालिकांची प्रभाग संख्या सरकारने वाढवलेली नाही. मुरगाव, मडगाव आणि म्हापसा पालिकेची प्रभाग संख्या वाढवली आहे. मुरगाव व मडगावसाठी आता प्रत्येकी पंचवीस, तर म्हापसा पालिकेसाठी वीस प्रभाग निश्चित केले आहेत. डिचोली व कुंकळ्ळी पालिकेची प्रभाग संख्या दहावरून बारा करण्यात आली आहे, तर कुडचडे-काकोडा पालिकेची प्रभाग संख्या बारावरून चौदा करण्यात आली आहे. केपे पालिकेची प्रभाग संख्या अकरा करण्यात आली आहे.आता कोणत्या पालिकेच्या कोणत्या प्रभागात किती मतदारसंख्या ठेवावी, हे फेररचनेच्या प्रक्रियेअंती निश्चित होईल. त्यानंतर प्रभागांचे आरक्षण केले जाणार आहे. ही प्रक्रिया पालिका प्रशासन खातेच पार पाडणार आहे. सध्या फक्त प्रत्येक पालिकेची प्रभाग संख्या निश्चित केली गेली आहे. आता एकूण प्रभाग संख्या १५९ झाली आहे. (खास प्रतिनिधी)