गोव्यात मासळीच्या सांडपाण्यावरून दुचाकी घसरुन अपघात, युवतीचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2024 17:12 IST2024-03-24T17:11:25+5:302024-03-24T17:12:25+5:30

घटनास्थळी मिळालेल्या माहितीनुसार, मडगावहून कारवारच्या दिशेने जाणाऱ्या दुचाकी चालक रोहित पाटील (२५, व्हेटेगाळी-कारवार) व दिव्या दिगंबर नाईक-देसाई (रा. केरी, अंकोला-अवरसा) हे दोघे जात होते.

In Goa, two-wheeler falls on fish sewage, accident, young woman dies | गोव्यात मासळीच्या सांडपाण्यावरून दुचाकी घसरुन अपघात, युवतीचा मृत्यू

गोव्यात मासळीच्या सांडपाण्यावरून दुचाकी घसरुन अपघात, युवतीचा मृत्यू

 

काणकोण : माशे येथील वळणावर रविवारी झालेल्या अपघात अंकोला येथील एका मुलीचा दुर्दैवी अंत झाला. दिव्या दिगंबर नाईक-देसाई (रा. केरी, अंकोला-अवरसा) असे तिचे नाव आहे.

घटनास्थळी मिळालेल्या माहितीनुसार, मडगावहून कारवारच्या दिशेने जाणाऱ्या दुचाकी चालक रोहित पाटील (२५, व्हेटेगाळी-कारवार) व दिव्या दिगंबर नाईक-देसाई (रा. केरी, अंकोला-अवरसा) हे दोघे जात होते. दिव्या दुचाकीवर पाठीमागे बसली होती. माशे येथील वळणावर मासळीच्या सांडपाण्यावर त्यांची दुचाकी घसरली. दुचाकी रस्त्याच्या बाजुला असलेल्या विजेच्या खांबाला आपटली. दिव्या खांबावर आदळली. दोघेही खाली पडली. दिव्याचा जागीच मृत्यू झाला. १०८ रुग्णवाहिकेला तिला काणकोण इस्पितळात आणण्यात आले असता, डॉक्टरानी मृत घोषित केले.

दिव्या ही एका प्रसिद्ध कंपनीत सुरक्षा रक्षक म्हणून काम करीत असल्याची माहिती सूत्रांनी दिली. काणकोण पोलिसांनी तिच्या कुटुंबियाकड़े संपर्क साधला आहे. रोहित पाटील याच्याकडून पोलिस अधिक माहिती घेत आहेत. पोलिस निरीक्षक हरीश राउत देसाई पुढील तपास करीत आहेत.
 

Web Title: In Goa, two-wheeler falls on fish sewage, accident, young woman dies