सराफाचे लक्ष्य दुसरीकडे वळवून १.३२ लाखांचे दागिने लंपास; माय लेकीला अटक

By वासुदेव.पागी | Updated: June 15, 2024 16:27 IST2024-06-15T16:25:15+5:302024-06-15T16:27:20+5:30

दागिन्याच्या दुकानात जाऊन सराफाचे लक्ष्य दुसरीकडे गुंतवून ठेऊन दुसऱ्याबाजूने दागिने घेऊन पळण्याचा प्रकार पणजीत पुन्हा घडला आहे.

in goa jewels worth 1.32 lakhs were theft by diverting bullion target mother and daughter arrested | सराफाचे लक्ष्य दुसरीकडे वळवून १.३२ लाखांचे दागिने लंपास; माय लेकीला अटक

सराफाचे लक्ष्य दुसरीकडे वळवून १.३२ लाखांचे दागिने लंपास; माय लेकीला अटक

वासुदेव पागी, पणजीः दागिन्याच्या दुकानात जाऊन सराफाचे लक्ष्य दुसरीकडे गुंतवून ठेऊन दुसऱ्याबाजूने दागिने घेऊन पळण्याचा प्रकार पणजीत पुन्हा घडला आहे. परंतु यावेळी पणजी पोलिसांच्या हुशारीमुळे चोरट्या पकडल्या गेल्या आहेत. चोरट्या या अंजू चोप्रा आणि गीता चोप्रा या माय लेकींना पणजी पोलिसांनी अटक केले आहे. त्यांच्याकडून चोरीचा माल हस्तगतही करण्यात आला आहे. 

ही घटना गुरूवार दि. १३ रोजी संध्याकाळी ७.३० वांजता पणजी येथील ओरा शोरुममध्ये घडला. तक्रारादराने पणजी पोलिसांना दिलेल्या तक्रारीनुसार दोन महिला शोरूममध्ये आल्या. सराफाचे लक्ष्य वेगळ्या ठिकाणी वळविण्यासाठी दागिने दाखविण्यास सांगितले. दुसऱ्या बाजूने एकीने शोरूममधील हिऱ्यांची बंगडी उचलली आणि दुकानातून निसटली. नंतर दुसरी महिलाही गेली. हा प्रकार लक्षात आल्यानंतर सराफ संतोष वर्मा यांनी पणजी पोलीस स्थानकात तक्रार नोंदविली. निरीक्षक विजयकुमार चोडणकर यांच्या नेतृत्वाखाली पोलीसांनी वेगाने तपासाची चाके फिरविताना शोरूममधील सीसीटीव्ही कँमरे व इतर ठिकाणच्या कँमऱ्यातील फुटेज तपासून संशयितांचा शोध लावला. दोघा महिलांना अटक करण्यात आली आहे. त्यांनी चोरलेली हिऱ्यांची बांगडीही जप्त करण्यात आली आहे.

Web Title: in goa jewels worth 1.32 lakhs were theft by diverting bullion target mother and daughter arrested