सुधारित माध्यम धोरण आठ दिवसांत : पर्रीकर

By Admin | Updated: June 6, 2014 01:55 IST2014-06-06T01:52:50+5:302014-06-06T01:55:50+5:30

पणजी : राज्य सरकारने यापूर्वी ठरविलेल्या प्राथमिक शिक्षणाच्या माध्यम धोरणात किंचित बदल केला जाईल.

Improved media strategy in eight days: Parrikar | सुधारित माध्यम धोरण आठ दिवसांत : पर्रीकर

सुधारित माध्यम धोरण आठ दिवसांत : पर्रीकर

पणजी : राज्य सरकारने यापूर्वी ठरविलेल्या प्राथमिक शिक्षणाच्या माध्यम धोरणात किंचित बदल केला जाईल. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाच्या पार्श्वभूमीवर माध्यम धोरणातील थोडे शब्दप्रयोग बदलले जातील. येत्या आठ दिवसांत हे धोरण अधिसूचित होईल, असे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी गुरुवारी येथे पत्रकारांना सांगितले.
गोव्याचे माध्यम धोरण एव्हाना अधिसूचित झाले असते. सर्वोच्च न्यायालयाचा निवाडा येईल, याची आम्हाला कल्पना नव्हती. त्या निवाड्याचा अभ्यास करून माध्यम धोरणाची किंचित फेररचना आम्ही करत आहोत. शैक्षणिक संस्थांची मान्यता आणि शासकीय अनुदान हे दोन वेगवेगळे विषय असून या दोन्ही विषयांची दखल नव्या सुधारित माध्यम धोरणात घेतलेली असेल, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
(खास प्र्रतिनिधी)

Web Title: Improved media strategy in eight days: Parrikar