शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

इफ्फी वेळापत्रकानुसारच

By admin | Updated: June 22, 2014 02:25 IST

पणजी : आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे (इफ्फी) आयोजन वार्षिक वेळापत्रकानुसारच म्हणजे २० ते ३० नोव्हेंबर या कालावधीतच होईल, हे स्पष्ट झाले आहे.

पणजी : आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे (इफ्फी) आयोजन वार्षिक वेळापत्रकानुसारच म्हणजे २० ते ३० नोव्हेंबर या कालावधीतच होईल, हे स्पष्ट झाले आहे. त्यासाठी केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालय, तसेच गोवा मनोरंजन संस्थेने तयारी सुरू केली आहे. यासाठी ई-निविदा जारी केल्या आहेत. याच कालावधीत म्हणजे नोव्हेंबरच्या मध्यास सुरू होणारा सेंट फ्रान्सिस झेवियर्स फेस्त व शव प्रदर्शन सोहळा डिसेंबरअखेर चालणार आहे. त्यामुळे इफ्फीचे आयोजन २४ नोव्हेंबरपूर्वी पूर्ण करावे, अशी मागणी ख्रिश्चन बांधवांनी केली होती. ती सरकारने नाकारल्याचे स्पष्ट होते. राज्यात २00४ पासून सुरू झालेल्या इप्फीच्या तारखा निश्चित असतात. त्यासाठी एक वर्षापासून राज्याला नियोजन करावे लागते. दुसरीकडे झेवियर्स यांचे फेस्त हा गोव्यातील मोठा धार्मिक समारंभ याच कालावधीत आहे. त्यात यंदा झेवियर्स यांचे शव दर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. त्यासाठी देश-विदेशातून लाखो पर्यटक येतील, अशी ग्वाही पर्यटन खात्याने दिली आहे. त्यामुळे या काळात वाहतूक तसेच हॉटेलिंग व्यवसायावर ताण येऊ शकतो. झेवियर्स संताच्या शव दर्शनाचा लाभ देश-विदेशातील ख्रिश्चन बांधवांसाठी खूप महत्त्वपूर्ण असतो. त्यामुळे इप्फी सायबाच्या फेस्तापूर्वी म्हणजे २४ नोव्हेंबरपूर्वी पूर्ण करावा, अशी मागणी ख्रिश्चन बांधवांनी मनोरंजन संस्था, चित्रपट संचालनालयाकडे केली होती. दहा वर्षांपूर्वी म्हणजे २00४ मध्ये सेंट झेवियर्स यांचे शव दर्शनासाठी खुले केले होते. त्या वेळी साधारण अडीच लाख भाविक दर्शनासाठी गोव्यात आले होते. पर्यटन खात्यातर्फे फेस्तानिमित्त विदेशी भाविक गोव्यात यावेत म्हणून प्रयत्नही केले जातात. त्यामुळे भाविकांची संख्या वाढणार, अशी ग्वाही पर्यटन खात्याने यंदाही दिली आहे. फेस्तानिमित्त येणारे पर्यटक आणि इफ्फीचे प्रतिनिधी एकाच कालावधीत गोव्यात दाखल होतील. त्यामुळे गर्दी वाढून वाहतुकीसह सर्व संबंधित घटकांवर ताण वाढू शकतो. (प्रतिनिधी)