शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! नांदेड ग्रामीण पोलिसांनी उद्ध्वस्त केला शस्त्रांचा महाअड्डा; तब्बल ४,७९६ शस्त्रे जप्त
2
Mumbai Watermelon Case: कलिंगड प्रकरणात नवा ट्विस्ट, चौघांचा बुचकळ्यात टाकणारा 'ब्लड रिपोर्ट'; काय समोर आलं?
3
चिराग पासवान यांनी मांडली वेगळी चूल...! पंजाबमध्ये सर्व जागा लढविण्याची घोषणा
4
ऑपरेशन सिंदूरदरम्यान, पाकिस्तानचे ११ तळ उडवले, १३ विमाने पाडली, तसेच..., वर्षभरानंतर तिन्ही सैन्यदलांनी आकडाच सांगितला    
5
IPL 2026: युनिव्हर्स बॉस ख्रिस गेलचा 'तो' विक्रम इतिहासजमा, पंजाबच्या कूपर कॉन्लीची रेकॉर्ड ब्रेक इनिंग!
6
यंदा शनि जयंती कधी आहे? दर्श भावुका अमावास्या अन् सौभाग्य योग; पाहा, महत्त्व अन् मान्यता
7
भयंकरच घडलं! सात वर्षांपूर्वी केला होता प्रेमविवाह; सिरीशाला पतीने रिक्षा स्टॅण्डवरच संपवले 
8
तमिळनाडूत सस्पेन्स संपला! 'विजय' सरकारला राज्यपालांचा हिरवा कंदील; जाणून घ्या कधी होणार शपथविधी
9
देशातील १३ राज्यांत वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; ताशी ६० किमी वेगाने वाहणार वारे
10
बीड महामार्ग भूसंपादन घोटाळा: तत्कालीन जिल्हाधिकारी अविनाश पाठक पोलिसांच्या ताब्यात
11
Astro Tip: पैशांची कमतरता भासतेय? शुक्रवारी आवर्जून करा 'हे' ५ उपाय; लक्ष्मी होईल प्रसन्न 
12
क्रिकेट विश्वावर शोककळा! विराट कोहलीचा जुना सहकारी अमनप्रीत सिंग गिलचे वयाच्या ३६ व्या वर्षी निधन
13
मार्कशीटमधील खाडाखोड कळली अन् बापाची सटकली; ९ वर्षांच्या मुलीला क्रूरपणे संपवलं, नंबर १ चा होता अट्टहास
14
रंगांचा खेळ! रेड, ग्रीन तर माहितीय पण फूड पॅकेजिंगवरील ब्लू, येलो मार्कचा नेमका अर्थ काय?
15
१०,००० किमी मारक क्षमता, अनेक बडे देश टप्प्यात, अग्नी-६ सुपर क्षेपणास्त्र तयार, भारत जगाला दाखवणार ताकद
16
तुम्ही चुकून दुसऱ्याच्या मोबाईल नंबरवर रिचार्ज मारलात? पैसे परत घेता येतात की नाही...
17
थलापती विजय ७ मे रोजी मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार होता, झालाच नाही; हजारो समर्थक माघारी फिरले...
18
Firoza Khatun : जेलमध्ये जुळलं सूत! प्रेमासाठी ओलांडल्या धर्माच्या सीमा; जेलर फिरोजा खातूनने केलं कैद्यासोबत लग्न
19
राज्यपालांना दोनदा भेटले तरीही विजय यांना सत्तास्थापनेचं निमंत्रण नाही, राज्यघटनेत काय म्हटलंय?
20
Sangeetha Sornalingam: तृषा कृष्णनपेक्षा श्रीमंत आहे थलपति विजयची पत्नी संगीता, अभिनेत्रीपेक्षा ५ पट प्रॉपर्टी
Daily Top 2Weekly Top 5

गव्याच्या हल्ल्यात होमगार्ड ठार; बेतोडा परिसरात भीतीचे सावट, नागरिकांत खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2026 12:28 IST

या घटनेने संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क, फोंडा : बेतोडा जंक्शनजवळील कन्हेवाळ येथे गवा रेड्याच्या हल्ल्यात फोंडा पोलिस स्थानकात कार्यरत असलेल्या होमगार्डचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना बुधवारी संध्याकाळी घडली. दिनेश तुळशीदास गावडे (वय ४८, रा. उडीवाडा-उसगाव) असे मृताचे नाव असून, या घटनेने संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, फोंडा परिसरात अलीकडच्या काळात गवे रेडे दिवसाढवळ्या वावरताना दिसत असून नागरिकांकडून व्यक्त होत असलेली भीती अखेर खरी ठरली आहे. बुधवारी संध्याकाळी दिनेश गावडे हे बेतोडा येथे एका मित्राला भेटण्यासाठी गेले होते. त्यांनी आपली गाडी रस्त्याच्या कडेला उभी करून पुढे काही अंतर चालत गेल्यानंतर अचानक एका गव्याने त्यांच्यावर हल्ला चढविला. या घटनेची माहिती मिळताच फोंडा येथील इस्पितळात गावडे यांच्या नातेवाईक व मित्रांनी मोठी गर्दी केली.

फोंडा पोलिस स्थानकाचे निरीक्षक मोहन गावडे यांनीही इस्पितळात धाव घेतली. उसगाव येथील समाजकार्यकर्ते तुळशीदास प्रभू यांनी दिलेल्या माहितीनुसार, दिनेश गावडे यांच्या पश्चात पत्नी व दोन लहान मुले असा परिवार आहे. मोठी मुलगी यंदा सातवीत शिकत असून, मुलगा चौथीत आहे. दिनेश हे कुटुंबातील एकमेव कमावते सदस्य असल्याने त्यांच्या निधनाने कुटुंबावर मोठे संकट कोसळले आहे.

इस्पितळात नेत असताना दिनेश सोबत असणाऱ्या मित्रांशी बोलत होते..

गव्याची दोन्ही शिंगे दिनेश यांच्या जांघेत घुसल्याने ते गंभीर जखमी झाले. हल्ल्यानंतर गवा त्याच परिसरातच वावर करत उपस्थितांवर धावून जात होता. मात्र, लोकांनी आरडाओरड केल्यानंतर तो पळून गेला. गंभीर जखमी अवस्थेत असलेल्या दिनेश गावडे याला त्याच्या मित्रांनी तातडीने फोंडा येथील उपजिल्हा इस्पितळात दाखल केले. इस्पितळात नेण्यापूर्वी ते मित्रांशी संवाद साधत होते; मात्र उपचार सुरू असतानाच त्यांची प्रकृती अचानक खालावली आणि त्यांचा मृत्यू झाला.
 

English
हिंदी सारांश
Web Title : Home Guard Killed in Gaur Attack; Fear Grips Betoda

Web Summary : A home guard, Dinesh Gavade, died in Betoda after being attacked by a gaur. The incident has created fear in the area. Gavade, a resident of Usgaon, leaves behind his wife and two young children. He was the sole breadwinner for his family.
टॅग्स :goaगोवा