शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

‘आप’ कार्यकर्त्यांकडून सरकारचा निषेध

By admin | Updated: June 10, 2015 01:03 IST

म्हापसा : ‘आप’च्या कार्यकर्त्यांना साळगाव पोलिसांनी काढलेल्या नोटिसीविरोधात आप कार्यकर्त्यांनी मंगळवारी तोंडावर काळ्या पट्ट्या बांधून पोलीस स्थानकावर जाऊन

म्हापसा : ‘आप’च्या कार्यकर्त्यांना साळगाव पोलिसांनी काढलेल्या नोटिसीविरोधात आप कार्यकर्त्यांनी मंगळवारी तोंडावर काळ्या पट्ट्या बांधून पोलीस स्थानकावर जाऊन पोलीस व सरकारचा निषेध नोंदवला. दरम्यान, नोटीस बजावलेल्या आपच्या कार्यकर्त्यांच्या जबान्या पोलिसांनी मंगळवारी नोंदवून घेतल्या. कळंगुट येथे महिला पर्यटकांवर झालेल्या बलत्कारानंतर मंत्री दिलीप परुळेकर यांचा निषेध करण्यासाठी रविवारी जमलेल्या आपच्या कार्यकर्त्यांवर पोलिसांनी बेकायदा जमाव व खासगी मालमत्तेत अतिक्रमण केल्याचा आरोप ठेवून गुन्हा नोंद केला होता. मंत्र्यांचे अंगरक्षक विरेंद्र नाईक यांनी या संदर्भात तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी गुन्हा नोंद करून आप कार्यकर्त्यांना नोटीस बजावली होती व जबानी देण्यासाठी मंगळवारी स्थानकावर बोलावण्यात आले होते. या घटनेच्या पार्श्वभूमीवर आपच्या कार्यकर्त्यांनी तोंडाला काळ्या पट्ट्या बांधून पोलीस स्थानकावर येऊन पोलीस व सरकारचा निषेध नोंदवला.दरम्यान, गुन्हा नोंद झालेल्या दोन्ही कार्यकर्त्यांच्या जबान्या पोलिसांनी नोंद करून घेतल्या आहेत. निरीक्षक राजेश कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारनुसार आप कार्यकर्त्यांच्या जबान्या नोंद करून घेतल्या आहेत. गरज पडली तर आणखी काहीजणावर गुन्हा नोंद होऊ शकतो, असे ते म्हणाले.आपच्या कार्यकर्त्यांनी शांततेने आंदोलन केले असतानाही कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा नोंद करण्याच्या प्रकाराचा आपचे समन्वयक दिनेश वाघेला यांनी निषेध केला. लोकशाही पद्धतीने होणाऱ्या आंदोलनावर काळीमा फासण्याचे हे कृत्य असल्याचा आरोप त्यांनी केला.(खास प्रतिनिधी)