शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
2
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
3
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
4
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
5
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
6
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
7
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
8
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
9
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
10
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
11
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
12
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
13
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
14
स्वादिष्ट! पंजाबची फिरनी ते ओडिशाची खीर; जगातील सर्वोत्कृष्ट पदार्थांमध्ये 'या' ६ भारतीय पदार्थांची बाजी
15
RCB ला मोठा धक्का! DC विरुद्धच्या सामन्यातूनही धडाकेबाज फलंदाज OUT
16
ऑटो कंपन्यांमध्ये खळबळ! २०२८ पासून फक्त इलेक्ट्रीक दुचाकी विकता येणार, दिल्लीत पेट्रोलच्या दुचाकी बॅन होणार
17
सुपर ओव्हरमधील विकेट्स आणि धावा खेळाडूच्या खात्यात का जमा होत नाहीत? जाणून घ्या त्यामागचं कारण
18
Top Marathi News Live: काळजी घ्या, उष्णतेची लाट होरपळून काढणार! IMD चा महाराष्ट्रातील 'या' भागांना सर्तकतेचा इशारा
19
"घराणेशाही वाटेल...", अमोल मिटकरींकडून विधान परिषदेसाठी 'या' नावाची शिफारस; ट्विट करुन केली मागणी
20
"हा सल्ला उद्धव ठाकरेंसाठी आहे का?"; संजय राऊतांच्या निवडणुकीबाबतच्या विधानावर भाजपचा पलटवार
Daily Top 2Weekly Top 5

 रेन्देरांची संख्या घटल्याने गोव्यातील फेणी उद्योग धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2020 12:26 IST

अभ्यासातून निष्कर्ष: माडावर चढण्यास नव्या तरुणाचा नकार 

मडगाव: काजू फेणी प्रमाणेच माडाची फेणीही गोव्यात प्रसिद्ध . गोव्यातील पारंपरिक उद्योगामध्ये माडाच्या फेणी उद्योगाचा समावेश आहे. मात्र सध्या हे फेणीचे उत्पादन दिवसेंदिवस कमी होऊ लागले आहे. माडाची सूर (नीरा) काढणारे रेंदेर दिवसेंदिवस कमी होतात हे त्यामागचे मुख्य कारण आहे. माडाच्या फेणीच्या उद्योगा संदर्भात गोवा विध्यापिठाच्या गोवा बिझिनेस स्कूल या संस्थेने जो अहवाल तयार केला आहे त्यात अनेक कारणा बरोबरच याही कारणाचा उल्लेख करण्यात आला आहे.

गोव्यात रेंदेर हा शब्दच परांपरिकतेशी जुळला आहे. अनेक लोक गीतातून या रेन्देरांचा उल्लेख करण्यात आलेला आहे. दर दिवशी तीन वेळा माडावर चढून हे रेंदेर सूर काढतात. यावेळी ते गात असलेली गाणी गोव्यातील लोकवेदाचाच एक भाग झाली आहेत. पण माडावर चढण्याचा धोका लक्षात घेऊन नवीन तरुण या व्यवसायाकडे पाठ फिरवू लाघले आहेत. त्यामुळे गोव्यातील सर्वात जुना पारंपरिक व्यवसायच धोक्यात आला आहे.माडावर चढणारे रेंदेर ही कल्पना कित्येक कवींना स्फुरण देणारी असली तरी हे काम केवळ धोकदायकच नव्हे तर शरीरावर विपरीत परिणाम करणारेही आहे. माडावर चढताना गुढघ्यावर ताण येत असतो त्यामुळे कित्येकांचे गुढघे म्हातारपणात निकामी अथवा कमजोर होतात. एवढेच नव्हे तर पावसात माडावर निसरड होते. त्यामुळे घसरून पडण्याचाही धोका असतो. या पारंपरिक व्यवसायाला कुठले स्वरक्षण कवच नसल्यानेही हे काम करण्यास नवीन तरुण तयार नाहीत त्यामुळे सध्या गोव्यात रेन्देरांचा अक्षरशा  तुटवडा भासतो. या सर्वाचा परिपाक फेणीच्या उत्पादनावर होऊ लागला आहे.

याशिवाय माडाच्या सूरीचा (निर्‍याचा) उपयोग दुसर्‍या कामासाठीही होऊ लाघला आहे. या सूरीपासुन माडचे गूळ तयार होते तसेच जेवणासाठी वापरल्या जाणार्‍या वीनेगरही तयार केली जाते. ह्या दोन्ही वस्तूंना बाजारात भरपूर मागणी असल्याने आणि त्यांचा उत्पादन खर्च फेणी तयार करण्यापेक्षा स्वस्त असल्याने उत्पादक फेणीकडे पाठ फिरवू लागले आहेत. त्याचाही परिणाम फेणीवर होऊ लागला आहे.