शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
4
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
5
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
6
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
7
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
8
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
9
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
10
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
11
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
12
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
13
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
14
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
15
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
16
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
17
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
18
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
19
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
20
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय

Goa: सरकार १५ सप्टेंबरपूर्वी लाभार्थ्यांना ३३०.७८ कोटींची आर्थिक मदत मंजूर करेल का? काँग्रेसचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2023 17:50 IST

Goa News: गोवा सरकारचे समाजकल्याण खाते, महिला व बालविकास खाते आणि क्रीडा खात्याच्या विविध योजनांच्या लाभार्थींना ३३०.७८ कोटी रुपयांचे अर्थसहाय्य सरकारने अद्याप मंजूर केलेले नाही.

- नारायण गावस  पणजी - गोवा सरकारचे समाजकल्याण खाते, महिला व बालविकास खाते आणि क्रीडा खात्याच्या विविध योजनांच्या लाभार्थींना ३३०.७८ कोटी रुपयांचे अर्थसहाय्य सरकारने अद्याप मंजूर केलेले नाही. मागील आठ वर्षांहून अधिक काळ बाकी असलेली ३३०.७८ कोटींची संपूर्ण रक्कम १५ सप्टेंबर २०२३ पूर्वी वितरित होईल याची खात्री मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत देतील का? असा सवाल काँग्रेसचे माध्यम विभाग प्रमुख अमरनाथ पणजीकर यांनी केला आहे. कॉंग्रेसचे सरचिटणीस प्रदिप नाईक तसेच शिवोलीच्या गट अध्यक्ष पार्वती नागवेकर यांच्या उपस्थितीत काँग्रेस भवनात पत्रकार परिषदेला संबोधित करताना, भाजप सरकारकडे “मिशन टोटल कमिशन” च्या कार्यक्रमांवर खर्च करण्यासाठी पैसा आहे, परंतु गरजू गोमंतकीयांना देण्यासाठी निधी नाही असा आरोप अमरनाथ पणजीकर यांनी केला.

मिळालेल्या माहितीनुसार समाजकल्याण  खात्यात लाभार्थ्यांची ३५.७३ कोटी रक्कम प्रलंबित आहे. यात कोविड महामारीत अडचणीत आलेल्या उपेक्षित आणि असंघटित क्षेत्राला दिलासा म्हणून २१.५० कोटी, कोविडमुळे मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींच्या ८० कुटुंबांना १.६० कोटींची रक्कम वितरित केलेली नाही.  गंभीर अपंग व्यक्तींना आर्थिक सहाय्य म्हणून १.६० कोटींची रक्कम वितरीत करणे बाकी आहे, असे  पणजीकर यांनी नमूद केले. या व्यतिरिक्त, दयानंद सामाजिक सुरक्षा योजनेच्या लाभार्थ्यांची गेल्या दोन महिन्यांपासून ५५ कोटींची रक्कम प्रलंबित आहे, असे पणजीकर यांनी निदर्शनास आणले.

सरकारने ओबीसी विद्यार्थ्यांना पोस्ट मॅट्रिक शिष्यवृत्तीसाठी ३.६ कोटी, अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना प्री मॅट्रिक शिष्यवृत्तीसाठी ४.३७ लाख तसेच ओबीसी विद्यार्थ्यांना मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्तीसाठी १.६ कोटी अजूनही दिलेले नाहीत. सरकारने अनुसुचीत जाती व जमाती तसेच ओबिसी आणि कमजोर वर्गासाठी असलेल्या अटल आसरा योजनेचे ८.५८ कोटी दिलेले नाहीत अशी माहिती अमरनाथ पणजीकर यांनी दिली.

महिला आणि बालविकास  खात्याच्या  लाडली लक्ष्मी योजनेचे १५२२६ लाभार्थी १५२.२६ कोटी वितरणाच्या प्रतीक्षेत आहेत. तर गृह आधार योजनेचे १३४११७ लाभार्थी मे आणि जून महिन्याच्या ४०.२३ कोटी वितरणाच्या प्रतीक्षेत आहे. आता जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे अर्थसहाय्य जोडल्यास हा आकडा ८०.४७ कोटी होईल, अशी माहिती अमरनाथ पणजीकर यांनी दिली. ममता योजनेंतर्गत ४२८३ लाभार्थी एकूण ४.२८ कोटींच्या वितरणाच्या प्रतीक्षेत आहेत आणि २०५५ लाभार्थी प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेच्या १.२ कोटी वितरणाच्या प्रतीक्षेत आहेत, असे अमरनाथ पणजीकर यांनी सांगितले.

क्रिडा व युवा व्यवहार मंत्री गोविंद गावडे यांनी विवीध खेळाडू व पदक विजेत्यांना २ कोटी रुपये सरकारकडून देणे बाकी असल्याचे स्पष्टपणे मान्य केले आहे. "निधीची कमतरता" असल्याने जर्मनीत "स्पेशल ओलिंपीक" मध्ये सहभागी होवून १९ पदके जिकंलेल्या दिव्यांगाना सरकारने बक्षिस रक्कम दिलेली नाही असे लाजिरवाणे उत्तर गोविंद गावडे यांनी दिल्याचे अमरनाथ पणजीकर यांनी उघड केले.

टॅग्स :goaगोवाcongressकाँग्रेस