गोवा विद्यापीठाला नॅकचे 'ए+ ग्रेड'
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2025 08:42 IST2025-07-19T08:41:29+5:302025-07-19T08:42:08+5:30
नॅकच्या पथकाने काही दिवसांपूर्वी गोवा विद्यापीठाला भेट दिली होती.

गोवा विद्यापीठाला नॅकचे 'ए+ ग्रेड'
लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : गोवाविद्यापीठाला नॅकचे 'ए-प्लस ग्रेड' मानांकन प्राप्त झाले आहे. विद्यापीठाला प्रथमच हा मान प्राप्त झाल्याने सर्वत्र अभिनंदन होते आहे.
नॅकच्या पथकाने काही दिवसांपूर्वी गोवा विद्यापीठाला भेट दिली होती. यावेळी त्यांनी विद्यापीठाची कार्यपद्धती, शैक्षणिक आणि संशोधन आदी विविध निकष तपासले. त्यानुसार एकूणच शैक्षणिक आणि संशोधन उत्कृष्टतेची दखल घेत गोवा विद्यापीठाला नॅकचे ए-प्लस ग्रेड मानांकन प्राप्त झाले. त्याची शुक्रवारी घोषणा करण्यात आली.
गोवा विद्यापीठाला नॅकचे ए-प्लस ग्रेड मानांकन प्राप्त झाल्याबद्दल मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी विद्यापीठाचे अभिनंदन केले आहे. शैक्षणिक आणि संशोधन उत्कृष्टतेची दखल घेऊन विद्यापीठाला हा मान प्राप्त झाला असून, यासाठी गोवा विद्यापीठ आणि कुलपतींचे अभिनंदन.
सरकारने गोवा विद्यापीठाला नेहमीच सहकार्य केले आहे. मग ते पायाभूत सुविधांच्या विकासासाठी असो किंवा अन्य शैक्षणिक दृष्ट्या. यापुढेही विद्यापीठाने अशीच कामगिरी सातत्याने ठेवावी. सरकारकडून त्यांना भविष्यातही पूर्ण सहकार्य असेल.
- डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री