शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
2
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
3
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
4
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
5
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
6
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
7
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
8
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
9
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
10
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
11
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
12
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
13
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
14
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
15
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
16
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
17
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
18
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
19
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
20
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
Daily Top 2Weekly Top 5

गोव्याचा पर्यटन मोसम शुक्रवारी सुरू होणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2019 13:05 IST

पर्यटन हंगामासाठी गोवा सरकारची जय्यत तयारी

पणजी : गोव्याचा नवा पर्यटन मोसम येत्या शुक्रवारीपासून म्हणजेच 4 ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. पर्यटन मोसमाच्या स्वागतासाठी सरकारचे पर्यटन खाते तसेच गोवा पर्यटन विकास महामंडळ सज्ज होऊ लागले आहे. यंदाच्या पर्यटन मोसमात रशियन पर्यटकांची संख्या गेल्या वर्षीच्या तुलनेत वाढेल, असे सरकारी यंत्रणांना वाटू लागले आहे.पर्यटन क्षेत्रात गोवा सरकार विविध उपक्रम राबवते. त्याची दखल केंद्रीय पर्यटन मंत्रालयानेही घेतली आहे. साहसी पर्यटन क्षेत्रात गोव्याला नुकताच केंद्र सरकारने पुरस्कार दिला. उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्या हस्ते गोव्याचे उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर यांनी हा पुरस्कार स्वीकारला. गोव्याला वर्षाकाठी सरासरी साठ लाखांपेक्षा जास्त पर्यटक भेट देतात. यात बहुतांश देशी पर्यटक असतात. काही लाख परदेशी पर्यटक असतात. गेल्यावर्षी रशियन पर्यटक संख्येने कमी आले होते. पर्यटन खात्याचे संचालक संजीव गडकर यांना नव्या पर्यटन मोसमाविषयी विचारले असता, ते म्हणाले की यावेळचा पर्यटन मोसम चांगला जाईल. गोव्यात एकूण किती चार्टर्ड विमाने या मोसमात येतील याची आकडेवारी प्राप्त झालेली नाही. पण रशियन पर्यटक यावेळी जास्त संख्येने येतील. येत्या 4 रोजी रशियन पर्यटकांचे पहिले चार्टर्ड विमान येत आहे.दरम्यान, पर्यटन मोसमाच्या काळात गोव्याचे सागरकिनारे स्वच्छ असायला हवेत असे सरकारचे धोरण आहे. यावेळी बंगळुरूमधील कर्नाटका कमर्शीअल व इंडस्ट्रीयल महामंडळाला गोवा सरकारने किनारपट्टी स्वच्छतेचे कंत्राट दिले आहे. तीन वर्षासाठी एकूण पंचवीस कोटी रुपयांना हे कंत्राट दिले गेले आहे. येत्या दि. 1 ऑक्टोबरपासून या कंपनीचे कर्मचारी उत्तर व दक्षिण गोव्याच्या किनाऱ्यांच्या स्वच्छतेचे काम करणार आहे. यापूर्वी दृष्टी यंत्रणेकडून हे काम केले जात होते. पर्यटन खाते सांभाळणारे उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर यांनी लोकमतला सांगितले की, सरकार अ‍ॅपही सुरू करेल, जेणेकरून किनाऱ्यांवर कचरा दिसल्यास लोक त्याबाबतचा फोटो पाठवू शकतील व लगेच कंत्राटदार कंपनीच्या माणसांकडून संबंधित किनाऱ्यावर जाऊन तेथील कचरा काढला जाईल.

टॅग्स :goaगोवाtourismपर्यटन