शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
2
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
3
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
4
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
5
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
6
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
7
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
8
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
9
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
10
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
11
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
12
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
13
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
14
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
15
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
16
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
17
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
18
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
19
Chanakya Niti: शून्यातून विश्व निर्माण करायचंय? आचार्य चाणक्यांचे 'हे' १० विचार तुम्हाला नक्कीच दिशा देतील
20
९० दिवसांत २८ मृत्यू, मग पुजाऱ्याने दिला 'असा' सल्ला, संपूर्ण गाव झाला रिकामी, आता...  
Daily Top 2Weekly Top 5

मुंबई-गोवा महामार्ग कामाच्या विलंबाबाबत खासदारांना चिंता; राज्यसभेत मुद्दा केला उपस्थित

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2026 08:04 IST

राज्यसभेत शून्य प्रहराला मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग ६६ च्या रुंदीकरण आणि कामातील विलंबाबाबत गंभीर चिंता व्यक्त केली.

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी :राज्यसभा खासदार सदानंद शेट तानावडे यांनी राज्यसभेत शून्य प्रहराला मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग ६६ च्या रुंदीकरण आणि कामातील विलंबाबाबत गंभीर चिंता व्यक्त केली.

सदानंद तानावडे उन्नतीकरणाच्या तानावडे या महामार्गाचे महत्त्व अधोरेखित करताना म्हणाले की, 'कोकणपट्टा आणि गोव्यासाठी राष्ट्रीय महामार्ग ६६ जीवनवाहिनीच असून, पर्यटन, व्यापार, मालवाहतूक आणि एकूणच प्रादेशिक विकासात त्याची महत्त्वपूर्ण भूमिका आहे.

सुमारे दशकापूर्वी मंजूर करण्यात आलेल्या चौपदरीकरण प्रकल्पाचा उद्देश कनेक्टिव्हिटी सुधारणे, रस्ते सुरक्षितता वाढवणे आणि मुंबई ते गोवा दरम्यान प्रवासाचा वेळ कमी करणे हा होता. या प्रकल्पामुळे लाखो प्रवासी आणि पर्यटकांना मोठा दिलासा मिळणार होता. परंतु, दुर्दैवाने काम प्रलंबित आहे.'

तानावडे पुढे म्हणाले की, 'या महामार्गाच्या पूर्णत्वानंतर उद्योग, शेती, मत्स्यव्यवसाय आणि लघुउद्योजकांना मोठा फायदा होऊन मालवाहतुकीला गती मिळेल. परंतु, पर्यावरणीय मंजुरी, आराखड्यामधील जमीन संपादनातील अडचणी, बदल, कंत्राटदारांशी संबंधित समस्या आणि वाहतूक व्यवस्थापनातील अडथळे यामुळे प्रकल्पात सातत्याने विलंब होत आहे.

परिणामी, अनेक ठिकाणी अपूर्ण कामे, अरुंद मार्ग, अपूर्ण पूल आणि खराब रस्त्यांची स्थिती कायम आहे. पावसाळ्यात परिस्थिती अधिक गंभीर बनते. मुसळधार पावसामुळे अपूर्ण रस्ते अधिक धोकादायक होतात, वाहतूक कोंडी होते आणि अपघातांचा धोका वाढतो. ज्यामुळे प्रवाशांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागतो.

कालमर्यादा जाहीर करा

केंद्र सरकारने तातडीने उपाययोजना करून उर्वरित कामे जलद गतीने पूर्ण करावीत, संबंधित यंत्रणांमध्ये समन्वय वाढवावा आणि प्रकल्प पूर्ण होण्यासाठ स्पष्ट कालमर्यादा जाहीर करावी, असे तानावडे म्हणाले. 

English
हिंदी सारांश
Web Title : MP Concerned Over Mumbai-Goa Highway Delay; Raised Issue in Parliament

Web Summary : Rajya Sabha MP raised concerns about the delayed Mumbai-Goa highway expansion. Project delays cause hardship, increased accidents, and traffic. He urged the central government to expedite completion with a clear timeline.
टॅग्स :goaगोवाRajya Sabhaराज्यसभाBJPभाजपाhighwayमहामार्ग