केंद्राचा अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय; 'एक देश एक निवडणूक'ला मगोचा पाठिंबा
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2023 09:07 IST2023-09-02T09:05:35+5:302023-09-02T09:07:44+5:30
महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष या निर्णयाचा स्वागत करीत आहे.

केंद्राचा अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय; 'एक देश एक निवडणूक'ला मगोचा पाठिंबा
लोकमत न्यूज नेटवर्क पणजी: केंद्र सरकारच्या एक देश एक निवडणूक प्रस्तावाला राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा घटक पक्ष असलेला महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाने पाठिंबा दर्शविला आहे.
केंद्र सरकारने या प्रस्तावासाठी माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखाली विशेष समिती नियुक्त केली आहे. मगोचे अध्यक्ष दीपक ढवळीकर यांनी माध्यमांशी बोलातना सांगितले की एक देश एक निवडणूक धोरण राबविण्याची शक्यता पडताळून पाहण्यासाठी विशेष समिती स्थापन करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय हा अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष या निर्णयाचा स्वागत करीत आहे, असे ते म्हणाले.