शहरं
Join us  
Trending Stories
1
अरबी समुद्रात पाकिस्तान करणार होता कुरापती; माहिती मिळताच २४ तासांत भारताने उतरवली युद्धनौका
2
कैसे बोगस दाखला बनाया? एमआयएम नगरसेविका सहर शेखकडून शासकीय यंत्रणांची दिशाभूल
3
नाशिकच्या तरुणींना मलेशियात विकण्याचा कट? आयटी कंपनीतील 'त्या' प्रकरणाला मानवी तस्करीचे भयानक वळण
4
Mumbai Traffic Update: बीकेसीत मेट्रोचा बीम कोसळला! क्रेन उलटल्याने मोठा अपघात; कुर्ला-वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक विस्कळीत
5
आज सोन्या-चांदीच्या किमतीत किती झाला बदल? ऑल टाईम हायवरुन Silver १,६४,८४४ रुपयांनी खाली; सोन्याची किंमत किती?
6
IPL 2026: आधीच KKRची एक सामना जिंकायची मारामार, त्यात अजिंक्य रहाणेला BCCIचा मोठा दणका
7
सुपर डुपर हिट... ‘वंदे भारत’ची कमाल कामगिरी, ९ कोटी प्रवाशांचा प्रवास; २७४ जिल्हे, १६४ सेवा!
8
जुलैपासून पुन्हा वाढणार जगाचं टेन्शन! भारतावरही होणार परिणाम, अमेरिकेनं स्पष्ट शब्दांत दिले संकेत
9
Share Market: शेअर बाजारात तुफान तेजी! सेंसेक्समध्ये १२०० अंकांची उसळी; निफ्टी २४,२०० च्या वर; 'या' शेअर्समध्ये जोरदार रॅली
10
२१ तास चर्चा करूनही अमेरिका-इराणमध्ये करार का झाला नाही? व्हान्स यांनी सांगितली Inside Story
11
शेतकऱ्यांच्या घामाच्या पैशांवर पीक विमा कंपन्या मालामाल, नऊ वर्षांत कमावले ७३,६३० काेटी
12
विकसित भारतासाठी प्रगती, निसर्ग आणि संस्कृतीचा त्रिवेणी संगम आवश्यक: पंतप्रधान नरेंद्र मोदी
13
भन्साळींच्या 'रोमँटिक' प्रोजेक्टसाठी शाहरुखचा 'ग्रीन सिग्नल'? वयानुसार भूमिका करणार किंग खान
14
SIP साठी कोणती तारीख आहे बेस्ट? १ की १५? जास्त परतावा मिळवण्यासाठी 'या' एका गोष्टीवर द्या लक्ष
15
राशीभविष्य, १५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती संभवते, दांपत्य जीवनात आनंद दरवळेल, लाभ संभवतात!
16
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
17
दादर-रत्नागिरी पॅसेंजर पुन्हा दादरवरून धावणार? व्यवहार्यता अहवालावरच पुढील निर्णय अवलंबून
18
कल्याणच्या पेडलरने पोहोचवले कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज, सहा अटकेत, पुरवठादार आनंद पटेलला नाट्यमयरीत्या अटक
19
इराणची अमेरिकेकडून कोंडी; १० हजार सैनिक केले तैनात, २४ तासांत एकही जहाज अमेरिकेच्या घेऱ्यातून पुढे नाही
20
मकर संक्रांती ते चैत्र पौर्णिमा; चार महिने चालणार हरिद्वारचा अर्धकुंभ, वाचा शाही स्नानाचे संपूर्ण वेळापत्रक
Daily Top 2Weekly Top 5

न्यूड पार्टीच्या जाहिरातबाजीने गोवा सरकारची अडचण; आरोपीला अजून अटक नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2019 16:15 IST

न्यूड पार्टी गोव्यात आयोजित केली जाईल अशा प्रकारची जाहिरातबाजी जोरात सोशल मिडियावरून करण्यात आल्यानंतर गोवा सरकारसमोर मोठी अडचण निर्णाण झाली.

पणजी: न्यूड पार्टी गोव्यात आयोजित केली जाईल अशा प्रकारची जाहिरातबाजी जोरात सोशल मिडियावरून करण्यात आल्यानंतर गोवा सरकारसमोर मोठी अडचण निर्णाण झाली. या जाहिरातबाजीशी गोव्याचा संबंध नाही, कारण जाहिरात दिल्लीहून केली जाते असे सरकारने सांगून हात झटकण्याचा प्रयत्न केला होता. मात्र महिला फोरम आणि विरोधी पक्षांनी सरकारच्या पर्यटन धोरणाला टीकेचे लक्ष्य बनविले आहे. तसेच जाहिरात करणाऱ्या संबंधित आरोपीला पकडून अटक केली जाईल असे सरकारने जाहीर केले होते. मात्र अजुनही संबंधित आरोपीला अटक न केल्याने सरकारवर टीका करण्यात येत आहे.

उत्तर गोव्यातील आश्वे- मोरजी येथे न्यूड पार्टी आयोजित केली जाईल व त्यात देशी व विदेशी महिला असतील अशा प्रकारची जाहिरात केली गेली. अगोदरच गोवा सरकारने कॅसिनो जुगाराला प्रोत्साहन दिल्याने भाजप सरकारविरुद्ध टीका होत आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पूर्वीचे काही जबाबदार पदाधिकारीही सरकारवर टीका करत आहेत. माजी संघचालक सुभाष वेलिंगकर यांनीही सोशल मीडियावरून टीकेची झोड उठवली आहे.

तसेच आता न्यूड पार्टीची जाहिरात गाजू लागल्यानंतर गृह खाते सांभाळणारे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची अडचण झाली आहे. मुख्यमंत्री देव दर्शनाला केरळमध्ये गेले होते, पण तिथूनच त्यांनी गोवा पोलिसांशी संपर्क साधला व न्यूड पार्टी प्रकरणी चौकशी करण्याची सूचना केली. पोलिसांनी चौकशी केली व जाहिरात दिल्लीहून केली जाते असा शोध लावला. आरोपीला अटक केली जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले होते पण तीन दिवस झाले तरी देखील कोणत्याही संशयीताला अटक न झाल्याने महिला फोरमने न्यूड पार्टीच्या जाहिरातीचा निषेध केला व गोव्याला सॅक्स टुरिझमचे केंद्र बनवू नका असाही सल्ला विविध घटकांना दिला.

गोव्याने जागतिक पर्यटन दिवस शुक्रवारी साजरा केला. हे निमित्त साधून केंद्रातील एनडीएचा भाग असलेल्या गोवा फॉरवर्ड पक्षाने टीकेचा सूर लावला आहे. ड्रग्ज, सॅक्स यामुळे गोव्याच्या पर्यटनाची अधोगती होत आहे, पातळी घसरत आहे, अशी टीप्पणी गोवा फॉरवर्ड पक्षाचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांनी शुक्रवारी एका ट्विटरद्वारे केली आहे.

सरकारचा प्राधान्यक्रमच चुकल्याने ड्रग्ज, सॅक्स, जुगार, न्यूड पार्टी अशासाठी गोव्याचे पर्यटन ओळखले जाऊ लागले आहे. तुकड्यातुकड्यांचे शॅाक धोरण किंवा कचरा व्यवस्थापन धोरण म्हणजे गोव्याचे पर्यटन नव्हे हे गोव्यातील सत्ताधाऱ्यांनी लक्षात घ्यायला हवे,असे सरदेसाई यांनी म्हटले आहे. गोव्याला भेट देणा:यांची सुरक्षा व स्थानिकांचा सामाजिक- आर्थिक विकास अपेक्षित असलेले र्सवकष पर्यटन धोरण गोव्याला हवे आहे असे सरदेसाई यांनी म्हटले आहे.

टॅग्स :Pramod Sawantप्रमोद सावंतgoaगोवा