Goa Election 2022 : शिवसेना गोव्यातील राजकारणात अधिक सक्रियपणे उतरणार: आदित्य ठाकरे
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2022 19:30 IST2022-02-12T19:30:04+5:302022-02-12T19:30:25+5:30
शिवसेना भूमिपुत्रांंना न्याय देणारा पक्ष आहे.गोव्यात शिवसेनेला सकारात्मक वातावरण आहे.त्यामुळे गोव्यातील राजकारणात पक्ष अधिक सक्रियपणे उतरेल : आदित्य ठाकरे

Goa Election 2022 : शिवसेना गोव्यातील राजकारणात अधिक सक्रियपणे उतरणार: आदित्य ठाकरे
पणजी: शिवसेना भूमिपुत्रांंना न्याय देणारा पक्ष आहे.गोव्यात शिवसेनेला सकारात्मक वातावरण आहे.त्यामुळे गोव्यातील राजकारणात पक्ष अधिक सक्रियपणे उतरेल असे महाराष्ट्राचे शिवसेनेचे मंंत्री आदित्य ठाकरे यांंनी पत्रकार परिषदेत सांगितले. गोव्यातील विधानसभा निवडणूकीत शिवसेने ने ११ उमेदवार उमेदवार उभे केले आहेत. पक्षाच्या उमेदवारांंना मतदारांंकडून उत्फुर्त प्रतिसाद मिळत आहे. ज्या प्रमाणे शिवसेना महाराष्ट्रात सुशासन देत आहे, त्याच पद्धतीचे सुशासन गोव्यातही शिवसेना देऊ इच्छित असल्याचे त्यांंनी सांगितले.
महाराष्ट्रात भाजप व शिवसेनेची युती होती. सदर युती चांगल्या पद्धतीने पुढे जावी अशी अपेक्षा होती. शिवसेनेकडून युती पुढे नेण्याचा प्रयत्नही झाला. भाजपला अडचण होऊ नये यासाठी शिवसेना गोव्यातील राजकारणात फारशी सक्रिय नव्हती. मात्र शिवसेच्या पाठीत खंंजीर खुपसण्यात आला. त्यामुळेच आता शिवसेना गोव्यातील सक्रिय राजकारणात उतरत आहे. मणिपूर, पश्चिम बंंगाल, उत्तर प्रदेश, बिहार, मणिपूर, सिलवासा येथे सुद्धा शिवसेनेने उमेदवार उभे केल्याचे ठाकरे यांनी सांगितले.
"गोव्यात मागील दहा वर्ष भाजपचे सरकार आहे. केंद्रातही भाजपचेच सरकार आहे. मात्र राज्यात शाश्वत विकास होऊ शकला नाही. महत्त्वाच्या विषयांंकडे दुर्लक्ष केले गेले. पर्यटनाबरोबरच गोव्यात बेरोजगारी सुद्धा वाढत आहे. निवडणुकीत शिवसेनेचे डिपोझिट जप्त होईल अशी टीका केली जात आहे. जर आमचे डिपोझिट जप्त होणार आहे, तर मग कशाला घाबरतात, आम्हाला प्रचार करु द्या की," असे ठाकरे यांनी विरोधकांना सुनावले. यावेळी शिवसेना गोवा प्रभारी तथा खासदार संजय राऊत व मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर हजर होते.