Goa Election 2022 : काँग्रेसकडून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर नाही; मायकल लोबो म्हणतात, "मी शर्यतीत..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2022 19:39 IST2022-02-12T19:39:25+5:302022-02-12T19:39:47+5:30
Goa Election 2022 : कॉंग्रेसने अद्याप मुख्यमंत्री पदाचा उमेदवार जाहीर केलेला नसला तरी या पदाचे दावेदार आता पुढे येऊ लागले आहेत.

Goa Election 2022 : काँग्रेसकडून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर नाही; मायकल लोबो म्हणतात, "मी शर्यतीत..."
पणजी: काँग्रेसने अद्याप मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर केलेला नसला तरी या पदाचे दावेदार आता पुढे येऊ लागले आहेत. माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनीही अद्याप या पदासाठी दावा केलेला नसला तरी काल परवा काँग्रेसमध्ये दाखल झालेले मायकल लोबो यांनी स्वत: मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत असल्याचे सांगितले आहे.
निवडणुकीनंतर भाजपचा दारूण पराभव होणार आहे. भाजपला ८ पेक्षा अधिक जागा मिळणार नाहीत. काँग्रेस २२ जागा मिळून सत्तेवर येणार आहे. त्यामुळे पुढील सरकार हे काँग्रेसचेच असणार आहे. मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत ते आपणही असू असे लोबो यांनी म्हटले आहे. परंतु काँग्रेस पक्ष जो निर्णय घेईल तो आपल्याला मान्य असणार असल्याचेही त्यांनी नमूद केले.
मायकल लोबो यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश करतानाच बार्देश तालुक्यातील सर्व मतदारसंघातील काँग्रेस उमेदवार निवडून आणणार असल्याची घोषणा केली होती. त्यांच्या पत्नी डिलायला लोबो या शिवोली मतदारसंघात लढत आहेत.