Goa Assembly Election 2022 : गोव्यातील लोकांकडून सकारात्मक प्रतिसाद, भाजपला फक्त काँग्रेसच घरी पाठवू शकतो - पी. चिदंबरम
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2022 17:51 IST2022-02-12T17:50:09+5:302022-02-12T17:51:34+5:30
बहुमत मिळताच आम्ही त्वरीत सरकार स्थापनेचा दावा करू, चिदंबरम यांचं वक्तव्य

Goa Assembly Election 2022 : गोव्यातील लोकांकडून सकारात्मक प्रतिसाद, भाजपला फक्त काँग्रेसच घरी पाठवू शकतो - पी. चिदंबरम
पणजी : गोव्यातील लोकांकडून सकारात्मक प्रतिक्रिया यायला लागल्या असून, भाजपला फक्त काँग्रेसच घरी पाठवू शकतो. मी याबद्दल खूप आशावादी आहे आणि बहुमत मिळताच आम्ही त्वरीत सरकार स्थापनेचा दावा करू असे काँग्रेसचे वरिष्ठ निरीक्षक पी. चिदंबरम यांनी शनिवारी पणजी येथे पत्रकार परिषदेत सांगितले. यावेळी गोवा प्रभारी दिनेश गुंडू राव आणि वरिष्ठ उपाध्यक्ष एम.के. शेख उपस्थित होते.
काँग्रेसने दिलेली सर्व आश्वासने सरकार आल्यावर पूर्ण केली जातील. गोव्यातील जनता काँग्रेसला पूर्ण बहुमत देईल, असा आम्हाला विश्वास आहे, असे ते म्हणाले. एका प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले की, गोवा हे मोदींसाठी निवडणुकीचे ठिकाण बनले आहे. ते गोव्यात निवडणुकीच्या वेळीच येतात.