शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी तुम्हाला विकसित भारत देऊन जाईन, ही माझी गॅरंटी', शिवतीर्थावर नरेंद्र मोदींचं मोठं विधान
2
तुम्ही संपत्तीचे वारसदार तर आम्ही विचारांचे वारसदार, एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल
3
एकाधिकारशाही संपवण्यासाठी भाजपाला हद्दपार करण्याची गरज, शरद पवारांचा घणाघात
4
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा, संविधान, गडकिल्ले...राज ठाकरेंच्या PM मोदींकडे 'या' मागण्या
5
'उद्धव ठाकरेंनी तमाम हिंदू बांधवांनो म्हणणे सोडून दिले', देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
6
PM मोदींच्या नेतृत्वात महाराष्ट्रासह देशाचा विकास झाला, अजित पवारांचा विरोधकांवर निशाणा
7
"उद्धवजी महाराष्ट्रात चालणार नाहीत तुमचे नखरे, कारण आमच्यासोबत आलेत राज ठाकरे", रामदास आठवलेंची कवितेतून टीका
8
जसप्रीत बुमराहला विश्रांती, अर्जुन तेंडुलकरला संधी; मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात बरेच बदल
9
रश्मिका मंदानाकडून 'अटल सेतू'चं कौतुक; आदित्य ठाकरेंचा अभिनेत्रीला सल्ला अन् सरकारवर टीकास्त्र
10
गौतम गंभीर टीम इंडियाचा नवा कोच! द्रविडची रिप्लेसमेंट म्हणून BCCI प्रयत्नशील
11
शरीरातील बॅड कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी रामबाण आहे हळद आणि तुळस! असा करा वापर
12
मी माझा मुलगा तुमच्याकडे सोपवतेय, तो तुम्हाला निराश करणार नाही; रायबरेलीत सोनिया गांधी भावूक
13
Fact Check: पंतप्रधान मोदींच्या विजयाचा दावा करणारा राहुल गांधींचा 'तो' Video एडिटेड!
14
चांदीचा विक्रम, ₹86271 वर पोहोचली; सोनं घसरलं! पटापट चेक करा लेटेस्ट रेट
15
ममता बॅनर्जी आणि अभिषेक बॅनर्जी यांना जीवे मारण्याची धमकी!
16
दिल्ली मद्य घोटाळा; ED ने अरविंद केजरीवालांसह AAP विरोधात दाखल केली चार्जशीट
17
'नरेंद्र मोदींना आता जिल्हा परिषद, ग्रामपंचायतींच्या वॉर्डनिहाय सभांचं निमंत्रण दिलं पाहिजे', ठाकरे गटाचा टोला
18
भन्साळींच्या 'बाजीराव मस्तानी'साठी अलका कुबल यांनी दिलेलं ऑडिशन; 'या' एका गोष्टीमुळे गमावला सिनेमा
19
...अन् आम्ही काय करू शकतो हे जगाला दाखवून दिलं; जय शाह यांनी सांगितली पॉवर
20
"मी निवृत्त झालो नाही किंवा...", ब्रिजभूषण शरण सिंहांच्या वक्तव्याबाबत लोकांमध्ये चर्चा 

Goa: भाजप उमेदवार पल्लवी धेंपे आणि श्रीपाद नाईक यांच्याकडून अर्ज सादर

By किशोर कुबल | Published: April 16, 2024 2:47 PM

Goa Lok Sabha Election 2024: भाजप उमेदवार पल्लवी धेंपे (Pallavi Dhempe) व श्रीपाद नाईक (Shripad Naik) यांनी अनुक्रमे दक्षिण आणि उत्तर गोवा लोकसभा मतदारसंघातून आपापले उमेदवारी अर्ज जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर केले.

- किशोर कुबल पणजी -  भाजप उमेदवार पल्लवी धेंपे व श्रीपाद नाईक यांनी अनुक्रमे दक्षिण आणि उत्तर गोवा लोकसभा मतदारसंघातून आपापले उमेदवारी अर्ज जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर केले.

मुख्यमंत्री प्रमोद सावंत, प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे दोन्ही ठिकाणी उमेदवारांसोबत अर्ज भरताना उपस्थित होते. श्रीपाद नाईक यांनी दुपारी सव्वा बाराच्या सुमारास येथील जिल्हाधिकारी कार्यालयात निर्वाचन अधिकारी स्नेहा गीत्ते त्यांच्याकडे उमेदवारी अर्ज सादर केला. याप्रसंगी वरील दोघांसह आरोग्यमंत्री विश्वजीत राणे, पर्यटनमंत्री रोहन खंवटे, महसूलमंत्री बाबूश मोन्सेरात, कला संस्कृतीमंत्री गोविंद गावडे, पशुसंवर्धनमंत्री नीळकंठ हळर्णकर, आमदार दिव्या राणे, जेनिफर मोन्सेरात, प्रवीण आर्लेकर तसेच इतर आमदार व पदाधिकारी उपस्थित होते. भाजप कार्यालयाकडून मिरवणुकीने कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करीत श्रीपाद यांना जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत आणले.

उमेदवारी अर्ज भरल्यानंतर मडगाव येथे पल्लवी धेंपे पत्रकारांशी बोलताना म्हणाल्या की, 'विरोधकांबाबत मला काही बोलायचे नाही. माझा प्रचार सकारात्मक पद्धतीने चालला आहे. काँग्रेसने त्यांच्या स्वतःच्या प्रश्नांमध्ये लक्ष घालावे.' पल्लवी उमेदवारी अर्ज भरताना नागरी पुरवठामंत्री रवी नाईक, वीजमंत्री सुदिन ढवळीकर आदी उपस्थित होते.

... म्हणून उमेदवारी रामनवमीच्यापूर्वसंध्येला : मुख्यमंत्रीदरम्यान, मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांना भाजप उमेदवारांनी रामनवमीच्या पूर्वसंध्येला अर्ज भरण्याचा दिवस का निवडला? असे विचारले असता ते म्हणाले की, 'राम नवमीला आम्हा सर्वांना मंदिरांमध्ये जायचे आहे. धार्मिक कार्यक्रमांमध्ये सहभागी व्हायचे आहे. म्हणून आमच्या उमेदवारांनी मंगळवारी अर्ज भरले. काँग्रेस हे काही मानत नाही. त्यांनी 'राम सेतू' सुद्धा नष्ट करण्याचा प्रयत्न केला होता.'

टॅग्स :goa lok sabha election 2024गोवा लोकसभा निवडणूक निकाल २०२४north-goa-pcउत्तर गोवाsouth-goa-pcदक्षिण गोवाBJPभाजपा