दीड कोटींच्या जुन्या नोटा घेऊन आलेल्या पाचजणांना गोव्यात अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: January 10, 2020 03:20 PM2020-01-10T15:20:23+5:302020-01-10T15:29:05+5:30

कासरगोड—केरळ येथील पाचजणांना गुरुवारी रात्री काणकोण येथील पोळे चेक नाक्यावर अटक केली.

Five Keralians Arrested With 1.50 Crores Worth Old Currency | दीड कोटींच्या जुन्या नोटा घेऊन आलेल्या पाचजणांना गोव्यात अटक

दीड कोटींच्या जुन्या नोटा घेऊन आलेल्या पाचजणांना गोव्यात अटक

Next

मडगाव: दोन वर्षापूर्वी चलनातून काढून टाकलेल्या तब्बल 1.48 कोटीच्या जुन्या एक हजाराच्या नोटा गोव्यात वठविण्यासाठी आलेल्या कासरगोड—केरळ येथील पाचजणांना गुरुवारी रात्री काणकोण येथील पोळे चेक नाक्यावर अटक केली. एका स्विफ्ट गाडीतून हे पाचहीजण गोव्यात आले होते.

काणकोण पोलिसांनी दिलेल्या माहितीप्रमाणो, अटक केलेल्यांची नावे अब्दुल कादर (44), बी सलीम (33), रझाक मेहमद (45), अबुबकर सिद्दीकी (32) व बी. युसूफ (32) अशी असून सध्या ते काणकोण पोलिसांच्या ताब्यात आहेत. या संशयितांच्या मालकिची केएल 14 यू — 3330 या क्रमांकाची गाडीही पोलिसांनी जप्त केली आहे.

दक्षिण गोव्याचे पोलीस अधीक्षक अरविंद गावस यांनी दिलेल्या माहितीप्रमाणो, गोव्यात जुन्या नोटा विकत घेतात अशी माहिती मिळाल्यामुळे हे पाचहीजण त्या वठविण्यासाठी गोव्यात आले होते. मात्र त्यांना गोव्यात त्यासाठी गि:हाईक न मिळाल्याने या नोटा घेऊन परत जाताना त्यांना पोळेच्या चेक नाक्यावर अडविले. रात्रीच्या गस्तीवर असलेल्या सहाय्यक उपनिरीक्षक रमाकांत वेळीप यांनी या संशयितांना अटक केली. काणकोणचे उपनिरीक्षक रामचंद्र नाईक हे या प्रकरणात तपास करीत आहेत.

 

Web Title: Five Keralians Arrested With 1.50 Crores Worth Old Currency

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.