शहरं
Join us  
Trending Stories
1
तारीख ठरली...! सर्वात मोठी अट इराणला मान्य? 'पीस टॉक-२' संदर्भात अमेरिकेची मोठी घोषणा
2
होर्मुझच्या नाकेबंदीत अमेरिकेची झाली फजिती; मेथेनॉल घेऊन चीनचा टँकर सुरक्षित बाहेर पडला
3
गेल्या ९ वर्षांपासून अक्षय्य तृतीयेला Gold देतंय जबरदस्त रिटर्न, यावेळीही इतिहासाची पुनरावृत्ती होणार का?
4
अमरावतीत अल्पवयीन मुलींचे अश्लील व्हिडिओ व्हायरल; १९ वर्षीय अयान अहमदला पोलिसांनी केली अटक
5
PNB मध्ये ६० महिन्यांच्या FD मध्ये ₹२,००,००० जमा केले तर किती मिळेल व्याज? पाहा कॅलक्युलेशन
6
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
7
Video - नियतीचा खेळ! वैष्णोदेवीच्या दर्शनाला गेली बहीण, ५ वर्षांपूर्वी हरवलेला भाऊ 'भिकारी' म्हणून आला समोर
8
Noida Protest: हिंसक आंदोलनानंतर अखेर सरकारचा मोठा निर्णय; कामगारांना ३ हजारांची पगारवाढ
9
वैभवला शून्यावर बाद करण्याच्या १०० दिवस आधी, प्रफुल अन् पांड्या यांच्यात 'असं'च काही घडलं होतं
10
Mutual Fund मध्ये भरभरुन पैसे ओतताहेत लोक; ₹७० लाख कोटींच्या पार पोहोचलं AUM
11
Praful Hinge: प्रफुल हिंगेच्या यशाचं गुपित कळलं! वडील म्हणाले, "त्या दोन दिग्गज क्रिकेटपटूंनी माझ्या मुलाला घडवलं"
12
"शेवटचं बोलणंही होऊ शकलं नाही..."; जवळच्या मैत्रिणीच्या निधनानंतर गहिवरल्या मुमताज
13
३ व्रतांचा महासंयोग: प्रदोष-शिवरात्रि, स्वामी स्मरण दिन एकाच दिवशी; ३ उपाय करा, पुण्य मिळवा!
14
डोळ्यात मिरचीची पूड फेकली अन् ५ सेकंदात कोयत्याने केले सपासप वार; महिलेने युवकावर का केला हल्ला?
15
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
16
एकाच झटक्यात कंपनीनं काढले ३० हजार कर्मचारी, आता त्याच कंपनीनं नव्या CFO ना दिलं ₹२५० कोटींचं पॅकेज
17
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
18
चैत्र प्रदोष शिवरात्रि योग २०२६: कसे कराल व्रत? ‘असे’ करा शिवपूजन, म्हणा ‘हे’ प्रभावी मंत्र
19
भाजप सोडून नेताजी बोस यांचे पणतू चंद्रकुमार तृणमूलमध्ये, म्हणाले, ‘मी आता चूक सुधारली’
20
पाठीमागून आला अन्...; दिवसाढवळ्या गर्भवती महिलेसोबत घाणेरडं कृत्य, संतापजनक व्हिडीओ समोर!
Daily Top 2Weekly Top 5

वीज बिलांचा शॉक!

By admin | Updated: March 14, 2015 00:48 IST

पणजी : राज्यातील वीज ग्राहकांना भरमसाट बिले येऊ लागल्यामुळे सर्वसामान्य वीज ग्राहकांमध्ये प्रचंड संताप व्यक्त होत आहे. लहान-मोठ्या व्यवसायांनाही मोठा फटका बसला आहे.

पणजी : राज्यातील वीज ग्राहकांना भरमसाट बिले येऊ लागल्यामुळे सर्वसामान्य वीज ग्राहकांमध्ये प्रचंड संताप व्यक्त होत आहे. लहान-मोठ्या व्यवसायांनाही मोठा फटका बसला आहे. यात भर म्हणून येत्या १ एप्रिलपासून वीज दरात प्रति युनिट २० पैशांची वाढ होणार असल्याने ग्राहकांचे कंबरडे मोडणार आहे. वीज बिले वेळेत येत नाहीत. चार ते पाच महिन्यांनी एकदा वीज बिल येते. हे बिल एकदम काही हजार रुपयांचे आल्यानंतर ग्रामीण भागातील ग्राहकांचे अवसानच गळून पडते. उत्तर गोव्यातील अनेक ग्राहकांना सहा महिन्यांनी बिल आले आहे. ज्यांना पाचशे-सहाशे रुपयांचे बिल येत होते, त्यांना आता दहा-बारा हजारांचे बिल आले आहे. स्पॉट बिलिंग पद्धतीने यापूर्वी वीज खात्याने हात पोळून घेतले आहेत. या प्रयोगातून बंगळुरू येथील एका कंपनीला खात्याने फायदा करून दिला. स्पॉट बिलिंग पद्धतीमुळे दर महिन्यास ग्राहकांना बिले येतील, असे सांगण्यात आले होते. प्रत्यक्षात त्या योजनेचा फज्जा उडाला. एका बाजूने वेळेत बिले येत नाहीत म्हणून लोक हैराण आहेत, तर दुसऱ्या बाजूने काही हजार रुपये रकमेची बिले येऊ लागल्याने ती भरावी कशी, असा प्रश्न लोकांना पडला आहे. शेतकरी, बागायतदार अशा घटकांना मोटरपंप वापरावे लागतात. विजेवर चालणारे पंपसेट वापरल्याने बिल अलीकडे खूप मोठ्या प्रमाणात येते, असे शेतकऱ्यांनी सांगितले. लहान व्यावसायिकांना तर व्यवसायच नकोसे झाले आहेत. पणजीत अलीकडे वीजपुरवठाही वारंवार खंडित होऊ लागला आहे. (खास प्रतिनिधी)