रेल्वेतून पडल्याने तरुणाचा मृत्यू, ओळख पटवण्याचं काम सुरू
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2019 19:28 IST2019-07-01T19:28:00+5:302019-07-01T19:28:37+5:30
गोवा वैदयकीय महाविदयालय रुग्णालयातील शवागारात हा मृतदेह ठेवण्यात आला आहे.

रेल्वेतून पडल्याने तरुणाचा मृत्यू, ओळख पटवण्याचं काम सुरू
मडगाव : धावत्या रेल्वेतून खाली पडल्याने एकाचा मृत्यू झाला आहे. गोव्यातील तिसवाडी तालुक्यातील नेवरा येथे रविवारी ही घटना घडली. मृताची ओळख अद्याप पटविण्यात आली नाही नसून अंदाजे पंचवीस ते पस्तीस वयोगटातील हा तरुण आहे.
गोवा वैदयकीय महाविदयालय रुग्णालयातील शवागारात हा मृतदेह ठेवण्यात आला आहे. पोलिसांनी घटनास्थळी जाउन पंचनामा केला. कोकण रेल्वे पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शैलेश नार्वेकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक टी.बी. मडकईकर पुढील तपास करीत आहेत.