शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षाचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
2
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
3
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप
4
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
5
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
6
'जेव्हा इंडस्ट्रीमधले लोकच...'; मॅडनेस मचाएंगे'मध्ये करण जोहरची उडवली खिल्ली, पोस्ट शेअर करत दिली प्रतिक्रिया
7
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
8
संपादकीय: झपाटलेल्या झुंडीचे बळी
9
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
10
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
11
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
12
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
13
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
14
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
15
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
16
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
17
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
18
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
19
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
20
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा

सनदी अधिकारी बनण्याचे स्वप्न - आयुषी साहू 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 07, 2019 12:45 AM

केंद्रीय माध्यमिक शिक्षण बोर्डाचा दहावीचा निकाल सोमवारी जाहीर झाला. या निकालात केंद्रीय विद्यालय, बांबोळीच्या आयुषी साहू हिने राज्यात प्रथम येण्याचा मान मिळवला.

प्रवीण साठेपणजी - केंद्रीय माध्यमिक शिक्षण बोर्डाचा दहावीचा निकाल सोमवारी जाहीर झाला. या निकालात केंद्रीय विद्यालय, बांबोळीच्या आयुषी साहू हिने राज्यात प्रथम येण्याचा मान मिळवला. आयुषी हिने ९८.६ टक्क्यांनी बाजी मारली. आपल्या मेहनतीचे चीज झाले, वैद्यकीय शाखेतून शिक्षण घेत भविष्यात सनदी अधिकारी होण्याचे स्वप्न बाळगले आहे, असे आयुषीने ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. ती म्हणाली की...

दहावीच्या परीक्षेत जास्त टक्के मिळवण्याचा कुठलाही दबाव नव्हता. परिवाराकडूनही तशी अपेक्षा नव्हती. परंतु सातत्यपूर्ण मेहनत केली आणि त्याचे चीज झाले. या निकालाने मलाही आश्चर्य वाटते. राज्यात प्रथम आल्याचे कळताच आनंद गगनात मावेनासा झाला. 

पूर्ण वर्षात दिवसातून केवळ एक ते दोन तास अभ्यास करायचे. फक्त परीक्षेच्यावेळी पूर्ण दिवस अभ्यास केला. फावल्या वेळेत संगीत ऐकायचे. त्यामुळे मन प्रसन्न राहण्यासाठी मदत झाली. शाळेतील प्रत्येक शिक्षकांनी खूप मदत केली. वेळोवळी उद्भवणाºया प्रश्नांचे तत्काळ निरसन त्यांच्याकडून व्हायचे. 

आई-वडिलांचा अभ्यासासाठी कोणताच दबाव नव्हता. एवढेच टक्के मिळाले पाहिजेत, यासाठी जबरदस्ती केली नाही. तुला जे साध्य करायचे आहे ते तू कर, असे ते नेहमी सांगायचे. टीव्ही पाहू नको किंवा मोबाइल वापरू नको, असे सुद्धा कधी त्यांनी सांगितले नाही. माझ्या प्रत्येक गोष्टीत त्यांनी मला पूर्ण सहकार्य केले.

‘बुद्धि’बळाचा फायदा

गणित आणि विज्ञान हे माझे सर्वांत आवडते विषय. तर बुद्धिबळ हा खेळ खूप आवडतो. रिकाम्या वेळेत मी बुद्धिबळ खेळते. बुद्धिबळाने माझ्या एकाग्रतेत वाढ होते. बुद्धीला चालना मिळते. परीक्षेसाठी मला या खेळाचा खूप फायदा झाला. शरीर आणि मनाच्या व्यायामासाठी एखादातरी खेळ खेळायला हवा, असा सल्ला तिने दिला. 

केंद्रीय विद्यालय बांबोळीचा शंभर टक्के निकाल

केंद्रीय विद्यालय बांबोळीतून ५३ विद्यार्थ्यांनी केंद्रीय माध्यमिक शिक्षा बोर्डाची दहावीची परीक्षा दिली. शाळेचे सर्व विद्यार्थी चांगल्या टक्केवारीसह उत्तीर्ण झाले. सर्व विद्यार्थ्यांचे शाळेचे प्राचार्य आर. ए. पाटील यांनी अभिनंदन केले आहे. 

टॅग्स :CBSE Examसीबीएसई परीक्षाEducation Sectorशिक्षण क्षेत्रgoaगोवा