शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षपदी डिसोझांची आठवडाभरात नियुक्ती

By admin | Updated: June 7, 2015 01:32 IST

पणजी : गोवा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष म्हणून माजी मंत्री जुझे फिलिप डिसोझा यांची नियुक्ती करण्याचे पक्षश्रेष्ठींच्या पातळीवर ठरले आहे.

पणजी : गोवा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष म्हणून माजी मंत्री जुझे फिलिप डिसोझा यांची नियुक्ती करण्याचे पक्षश्रेष्ठींच्या पातळीवर ठरले आहे. येत्या आठवडाभरात यासंबंधी नियुक्तीचा आदेशही जारी होण्याची शक्यता आहे.जुझे फिलिप डिसोझा हे पूर्वी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष होण्यास तयार नव्हते. पक्षासाठी खर्च करण्याची त्यांची तयारी नव्हती. तथापि, सुहास वळवईकर हे प्रदेशाध्यक्षपदी नको म्हणून जुझे फिलिप यांच्या नेतृत्वाखाली अनेक पदाधिकाऱ्यांनी बंड केले व शेवटी जुझे फिलिप यांनी आपण प्रदेशाध्यक्षपद स्वीकारण्यास तयार आहोत, असे मुंबईत झालेल्या बैठकीवेळी राष्ट्रवादीचे केंद्रीय नेते प्रफुल्ल पटेल यांना सांगितले. देवानंद नाईक, ट्रोजन डिमेलो, सलिम सय्यद आदी बहुतेक पदाधिकारी हे जुझे फिलिप यांच्या बाजूने असल्याचे पटेल यांना मुंबईतील बैठकीवेळी कळाले व त्यांनी जुझे फिलिप यांचे नाव प्रदेशाध्यक्ष म्हणून निश्चित केले. राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्याशीही पटेल यांनी बोलणी केली असल्याची माहिती खास सूत्रांनी दिली आहे. जुझे फिलिप डिसोझा यांना प्रदेशाध्यक्ष करण्यास पक्षाचे समन्वयक प्रफुल्ल हेदे व निरीक्षक जाधव हेही तयार झाले आहेत, असे सूत्रांकडून कळते. यापुढे पक्षाच्या गोवा शाखेचा खर्च हा मुंबईहून राष्ट्रवादीच्या कार्यालयातून केला जाणार आहे. पटेल यांनी मुंबईतील बैठकीवेळी तसे सुतोवाच केले. दरम्यान, जुझे फिलिप डिसोझा यांनी नजीकच्या काळात काँग्रेस पक्षात जाण्याचा विचार सोडून दिला आहे, असे त्यांच्या काही कार्यकर्त्यांनी सांगितले. प्रदेशाध्यक्ष बनल्यानंतर २०१७ सालची निवडणूकही राष्ट्रवादीच्याच तिकिटावर लढवावी, असे जुझे फिलिप यांनी ठरविले आहे. २०१७च्या निवडणुकीवेळी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसची युती होण्याची शक्यता नाही; कारण काँग्रेसला युती नको आहे. (खास प्रतिनिधी)