दारुनं केला घात ! फिल्मी स्टाईलप्रमाणे मित्राचाच केला गेम, आरोपी पोलिसांच्या जाळ्यात
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2017 13:00 IST2017-09-28T13:00:21+5:302017-09-28T13:00:28+5:30
दारूच्या नशेत आपल्याच मित्राची अगदी फिल्मी स्टाईलमध्ये डोक्यात गोळी घालून हत्या केली. गोव्यातील ही घटना आहे.
_201707279.jpg)
दारुनं केला घात ! फिल्मी स्टाईलप्रमाणे मित्राचाच केला गेम, आरोपी पोलिसांच्या जाळ्यात
मडगाव (गोवा) : दारूच्या नशेत आपल्याच मित्राची अगदी फिल्मी स्टाईलमध्ये डोक्यात गोळी घालून हत्या केल्यानंतर संशयित फय्याज उर्फ छोटू केलेल्या पापाचं प्रायश्चित्त करण्यासाठी कर्नाटकातील मूळ गावी देवदर्शनाला जाऊन आला. देवदर्शन आटोपून गुरूवार (28 सप्टेंबर) सकाळी बेती-रामनगर (पर्वरी) येथील आपल्या सासुरवाडीस आला असता मडगाव पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या. व्यवसायाने मॅकेनिक असलेल्या छोटुने दोन दिवसांपूर्वी म्हणजे मंगळवारी (26 सप्टेंबर) शांतीनगर रावणफोंड (मडगाव) येथे एका बारमध्ये दारू पित बसलेल्या अब्दुल कादर (४२) या मूळ कर्नाटकातील गवंड्याच्या डोक्यात देशी कट्टयाने गोळी झाडून त्याची हत्या केली. यावेळी त्यानं अगदी फिल्मी स्टाईलमध्ये त्याने कादरच्या कनपटीला कट्टा लावून ‘क्या तुझे टपकांऊ क्या?’ असे म्हणत अगदी जवळून गोळी झाडली होती. त्यानंतर तो फरार झाला होता.
बुधवारी त्याची स्कूटर पोलिसांना सापडली होती. मात्र त्याचा पत्ता लागू शकला नव्हता. कदाचित बेती-रामनगर येथील आपल्या सासुरवाडीस तो येण्याची शक्यता असल्याने मडगांव पोलिसांनी तेथे सापळा रचून ठेवला होता. गुरूवारी सकाळी तो आला असता पोलिसांच्या तावडीत तो सापडला. या प्रकरणात मडगांवचे पोलीस निरीक्षक सी.एल. पाटील हे तपास करत आहेत.