केवळ आरोप नकोत, नोकरीसाठी पैसे घेणाऱ्यांची नावेच सांगा : मुख्यमंत्री प्रमोद सावंत
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2026 08:17 IST2026-01-15T08:16:29+5:302026-01-15T08:17:34+5:30
रोजगार निर्मितीवरून वेन्झींची टीका

केवळ आरोप नकोत, नोकरीसाठी पैसे घेणाऱ्यांची नावेच सांगा : मुख्यमंत्री प्रमोद सावंत
लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : पैसे देऊन जर कुणी सरकारी नोकरी घेतली असल्यास नावे सांगा, चौकशी करू, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आज, बुधवारी विधानसभेत सांगितले.
राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेदरम्यान आमदार कॅप्टन वेन्झी व्हीएगस यांनी सरकारवर जोरदार टीका केली. सरकारी नोकऱ्यांमध्ये घोटाळा हा अत्यंत गंभीर विषय असून, युवकांना सरकारी नोकरी मिळवण्यासाठी पैसे द्यावे लागत असल्याचा आरोप त्यांनी केला. यावर मुख्यमंत्र्यांनी जर कोणी कुणाला पैसे देऊन सरकारी नोकरी मिळवली असेल, तर त्यांची नावे सांगा. सरकार त्याची चौकशी करेल. विनाकारण आरोप करू नयेत, असे स्पष्ट केले.
व्हीएगस म्हणाले, रोजगारनिर्मिती आणि विकास केवळ भाषणांमधून होणार नाही, त्यासाठी सरकारने प्रत्यक्ष निधीची तरतूद करणे आवश्यक आहे. बेकायदेशीर भू-रुपांतर, शेतजमिनी अहवाल, बुजवणे, हे प्रकार गंभीर आहेत. लोक त्याविरोधात आवाज उठवत आहेत. सरकारी रुग्णालयांतील अपुरी सुविधा, बर्च अग्निकांड प्रकरणाचा दंडाधिकाऱ्यांचा रोजगारनिर्मिती, वृद्धाश्रम व अनाथाश्रमांमध्ये सोयीसुविधा अशा महत्त्वाच्या मुद्द्यांचा राज्यपालांच्या अभिभाषणात उल्लेखच करण्यात आला नसल्याची टीका त्यांनी केली.
१६ जानेवारी हा 'जनमत कौल दिन' म्हणून राज्यपालांच्या भाषणात समाविष्ट करायला हवा होता. आम्हाला कॉपी-पेस्ट भाषण नको, अशी टीकाही व्हीएगस यांनी केली.