शहरं
Join us  
Trending Stories
1
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
2
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
3
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
4
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
5
कर्नाटक सरकारचे मराठी संपवण्याचे षडयंत्र! १० वीच्या निकालातून 'मराठी' शब्द गायब; सीमाभागात संताप
6
जगाचा इंटरनेट संपर्क तुटणार? इराणने होर्मुझ सामुद्रधुनीतील 'अंडर सी केबल्स'बाबतीत दिला थेट इशारा!
7
नागपूर हादरले! बेपत्ता हॉटेल मालकाचा नाल्यात पडलेल्या पोत्यात सापडला मृतदेह, 'हरी ओम' टॅटूमुळे पटली ओळख
8
"उद्धव ठाकरे लढणार असतील तर स्वागत; पण आताच..."; सावध झालेल्या काँग्रेसची मोठी मागणी, वडेट्टीवार काय म्हणाले?
9
Donald Trump : “तू जे केलंस ते खरोखरच अविश्वसनीय”; डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं भारतीय टेनिसपटूचं भरभरून कौतुक
10
इस्लामाबादला धक्का! अमेरिका-ईरान डीलसाठी इराणला पाकिस्तानवर विश्वासच वाटेना; आता... 
11
Top Marathi News LIVE Updates: शरद पवारांच्या प्रकृतीत सुधारणा, रुग्णालयातून सुट्टी मिळाली
12
फास्टॅग फसवणुकीचा नवा प्रकार! NHAI कडून महत्त्वाची सूचना जारी; एक चूक आणि होईल मोठं नुकसान
13
भयंकर...! आदल्या रात्री मित्राच्या बायकोवरही बलात्कार करून आलेला; IRS अधिकाऱ्याच्या मुलीच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा
14
“२०२७ यूपी विधानसभा निवडणुकीसाठी योगी आदित्यनाथच भाजपाचा चेहरा”; नितीन नवीन यांचे मोठे विधान
15
“उद्धव ठाकरे यांनीच विधान परिषदेची निवडणूक लढावी”; सुप्रिया सुळे यांनी केली आग्रहाची विनंती
16
पाकिस्तानची झोप उडाली! भारत-रशियामध्ये ३,००० सैनिकांचा मोठा करार, शेजारी देश तणावात
17
CSK ची नवी चाल! मुंबईकर आयुष म्हात्रेच्या जागी MI च्या माजी खेळाडूला मिळाली वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
उल्हासनगरात महापौरांचा पती भाजपच्या टार्गेटवर? आयुक्तांकडे महापौर पतीला एन्ट्री दिल्यावरून भाजपा नगरसेवकांचा धिंगाणा 
19
उन्हाळ्यात आवडीने कलिंगड खाताय... जाणून घ्या, किडनीवर ‘कसा’ होतो परिणाम?
20
नवरीचा अजब निर्णय! लग्नाला नकार, सासरी जाण्याऐवजी मैत्रिणीसोबत जाण्यावर ठाम; पोलीसही चक्रावले
Daily Top 2Weekly Top 5

कूळप्रश्नी टीका करू नका!

By admin | Updated: November 29, 2014 01:01 IST

पणजी : राज्यातील कूळ कायदा दुरुस्तीप्रश्नी जाहीर आक्षेप घेऊ नये किंवा टीका करू

पणजी : राज्यातील कूळ कायदा दुरुस्तीप्रश्नी जाहीर आक्षेप घेऊ नये किंवा टीका करू नये, अशी सूचना शुक्रवारी पर्वरी येथे मंत्रालयात मंत्रिमंडळ बैठकीवेळी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी सर्व मंत्र्यांना केली. मंत्रिमंडळ बैठकीपूर्वी या विषयावर मुख्यमंत्र्यांनी सत्ताधारी आघाडीतील घटक पक्ष असलेल्या महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाच्या मंत्र्यांशीही चर्चा केली. कूळ कायद्यात केलेल्या दुरुस्त्यांवरून राज्यात सध्या उलटसुलट मते व्यक्त होत आहेत. भाजपचे आमदार विष्णू वाघ यांच्यासह अनेक संघटनांनी दुरुस्त्यांना जाहीर आक्षेप घेतला आहे. म.गो. पक्षाचे मंत्री दीपक ढवळीकर यांनी तर कूळप्रश्नी आपण लोकांसोबत राहू, असे विधान केल्यानंतर भाजपचे माजी आमदार विश्वास सतरकर यांनी त्यांच्यावर टीका केली. काँग्रेसनेही कूळ कायद्यातील दुरुस्त्यांना विरोध केला आहे. या पार्श्वभूमीवर मंत्रिमंडळाच्या शुक्रवारी झालेल्या बैठकीत कूळप्रश्नी चर्चा होईल, अशी अपेक्षा होतीच. त्यानुसार मुख्यमंत्री पार्सेकर यांनी कूळ कायद्यातील दुरुस्त्या व सद्यस्थिती याबाबतची माहिती बैठकीवेळी मांडली. कूळ कायद्यातील दुरुस्ती विधेयकास पूर्वी विधानसभेत कुणीच विरोध केला नव्हता. दुरुस्त्या करण्यामागे हेतू वाईट नाही. एक वर्ष दुरुस्ती कायद्याची अंमलबजावणी होऊ द्या. कुळांसमोर काही अडचणी आल्या, तर मग कायद्याचा फेरआढावा घेता येईल. कुळांनी जमीन खरेदीसाठी अर्ज करण्याकरिता तीन वर्षांचे जे सनसेट कलम लागू केले आहे, त्याचाही आढावा घेऊन वर्षे आणखी वाढविता येतील, असे मुख्यमंत्री म्हणाले. कूळ कायदा दुरुस्तीबाबत कुठच्याच मंत्र्याने जाहीर वेगळा सूर लावू नये. त्याऐवजी आपल्याशी येऊन बोलावे, असेही आपण बैठकीवेळी सांगितले असल्याचे मुख्यमंत्र्यांनी नमूद केले. बैठकीनंतर पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री पार्सेकर यांनी अशीच भूमिका मांडली. पार्सेकर म्हणाले की, मनोहर पर्रीकर मुख्यमंत्रिपदी असताना त्यांच्यावर ते बहुजन समाजविरोधी असल्याची टीका व्हायची. मात्र, मी बहुजन समाजामधीलच असून कूळ कायद्यातील दुरुस्त्यांमागे गैर हेतू नाही, हे मला ठाऊक आहे. कूळ कायद्याचे त्रांगडे पंचेचाळीस वर्षे आहे. आम्ही अतिरिक्त दहा मामलेदार नेमले होते; पण त्यांच्याकडूनही कुळांचे खटले जलदगतीने निकालात काढणे जमले नाही. त्या मामलेदारांना आता अन्य काम दिले जाईल. कुळांना आता दिवाणी न्यायालयाकडे जावे लागेल. मामलेदारांकडेही जाताना कूळ शेतकरी वकील घेऊनच जात होते. आताही पाचशे रुपये शुल्क मोजून वकील घेऊनच जावे लागेल. काही फरक पडलेला नाही. (खास प्रतिनिधी)