शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
2
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
3
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
4
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
5
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
6
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
7
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
8
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
9
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
10
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
11
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
12
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
13
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
14
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
15
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
16
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
17
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
18
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
19
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
20
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
Daily Top 2Weekly Top 5

कापडी पिशव्यांचे वाटप सुरू, प्लास्टिक वापर बंदीविषयी मुख्यमंत्री ठाम

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2019 11:38 IST

गांधी जयंतीच्या मुहूर्तावर मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी बुधवारी पुन्हा एकदा प्लास्टिक वापर बंदीच्या घोषणोचा उच्चार केला.

पणजी : गांधी जयंतीच्या मुहूर्तावर मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी बुधवारी पुन्हा एकदा प्लास्टिक वापर बंदीच्या घोषणोचा उच्चार केला. सरकारच्या हस्तकला विकास महामंडळाने कापडी बॅगांचे वाटप बुधवारपासून सुरू केले. यापुढे बाजारपेठांमध्ये किमान दराने ह्या कापडी पिशव्या वितरित केल्या जातील, असे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले.पणजीत मुख्यमंत्र्यांच्या सहभागाने भाजपाने पदयात्रा काढली. आमदार बाबूश मोन्सेरात, महापौर उदय मडकईकर, अन्य सर्व नगरसेवक व भाजपाचे पणजीतील प्रमुख कार्यकर्ते पदयात्रेत सहभागी झाले. मुख्यमंत्र्यांनी पदयात्रेचे उद्घाटन केले. स्वच्छता, अहिंसा, सत्य या गांधींच्या गुणांचा आम्ही प्रसार करायला हवा. पर्यावरण सांभाळण्यासाठी सिंगल युज प्लास्टिक पिशव्यांचा वापर पूर्ण थांबवायला हवा, असे मुख्यमंत्री म्हणाले. आम्ही पहिल्या टप्प्यात कुणाला दंड ठोठावणार नाही. प्रथम फक्त जागृतीवर भर दिला आहे. प्लास्टिकच्या पिशव्यांचा वापर बाजारपेठांमध्येही पूर्णपणे टाळायला हवा. त्यासाठी कापडी पिशव्या उपलब्ध करून देण्याचा उपक्रम सरकारच्या महामंडळाने सुरू केला आहे. बुधवारी काही पिशव्या जुनेगोवे येथे झालेल्या गांधी जयंतीच्या सोहळ्यावेळी वितरीत केल्या गेल्या. यापुढे पालिकांनी बाजारपेठांमध्ये किमान दराने ह्या पिशव्या लोकांना द्याव्यात, असे मुख्यमंत्र्यांनी सुचविले.महापौरही भाजपातपणजीतील भाजप कार्यालयाकडून सुरू झालेली पदयात्र पणजी शहरात फिरून मग आझाद मैदानावर विसर्जित झाली. मुख्यमंत्र्यांनीच यात्रेचा समारोप केला. अनेक विद्यार्थी व शिक्षक पदयात्रेत सहभागी झाले. त्याशिवाय ब्रह्मकुमारी व अन्य संस्थांनीही भाग घेतला. या सर्वाचे आपण आभार मानतो. गांधी जयंतीचा कार्यक्रम केवळ एकच दिवस आयोजित करून आम्ही थांबणार नाही. वर्षभर सरकार विविध कार्यक्रम आयोजित करील, असे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले. महापौर मडकईकर, माजी महापौर विठ्ठल चोपडेकर वगैरे सगळे प्रथमच भाजपच्या उपक्रमात अधिकृतरीत्या सहभागी झाले. एकंदरीत त्यांचा भाजपात अधिकृतरीत्या प्रवेश झाल्यासारखे झाले. माजी आमदार सिद्धार्थ कुंकळ्ळ्येकर यांनी मात्र पदयात्रेत भाग घेतला नाही.

टॅग्स :Plastic banप्लॅस्टिक बंदी