चोडणकर प्रकरणी नि:पक्ष चौकशीची डीजींची ग्वाही

By Admin | Updated: May 27, 2014 01:35 IST2014-05-27T01:31:28+5:302014-05-27T01:35:49+5:30

पणजी : फेसबुकवरील टिप्पणी प्रकरणी देऊ चोडणकर यांची नि:पक्ष आणि योग्य प्रकारे चौकशी केली जाईल, त्यांनी चौकशीसाठी पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन पोलीस महासंचालक

DG's assurance to free party investigations in Chodankar case | चोडणकर प्रकरणी नि:पक्ष चौकशीची डीजींची ग्वाही

चोडणकर प्रकरणी नि:पक्ष चौकशीची डीजींची ग्वाही

पणजी : फेसबुकवरील टिप्पणी प्रकरणी देऊ चोडणकर यांची नि:पक्ष आणि योग्य प्रकारे चौकशी केली जाईल, त्यांनी चौकशीसाठी पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन पोलीस महासंचालक टी. मोहन यांनी सोमवारी येथे पत्रकारांशी बोलताना केले. फेसबुकवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरुद्ध मूळ चिंबल येथील अभियंते चोडणकर यांनी गेल्या मार्चमध्ये केलेल्या टिप्पणीमुळे निर्माण झालेला वाद सध्या गाजत आहे. पोलीस महानिरीक्षक ओ. पी. मिश्रा यांच्या उपस्थितीत बोलताना महासंचालक मोहन म्हणाले, की चोडणकर याने धार्मिक तणाव निर्माण होऊ शकतो, अशा प्रकारची टिप्पणी केल्याने अतुल पै काणे यांनी तक्रार केली. त्या तक्रारीच्या अनुषंगाने चौकशीचा भाग म्हणून आम्हाला देऊ चोडणकर हे हवे आहेत. पोलीस खात्याने त्यांच्या टिप्पणीची सुमोटो पद्धतीने दखल घेतलेली नाही. तक्रार आल्यानंतर आम्ही जी चौकशी करत आहोत, त्या चौकशी कामाशी चोडणकर यांनी सहकार्य करावे. आम्ही पक्षपातीपणे वागणार नाही. शेवटी आमची प्रत्येक कृती ही न्यायालयीन छाननीच्या कक्षेत येते. मोहन म्हणाले, की चोडणकर प्रकरणी जे पुरावे आहेत, ते सगळे तांत्रिक स्वरूपाचे आहेत; कारण त्यांनी संगणकावर टिप्पणी केली होती. फेसबुकवर अनेक प्रकारे लोक अनेक टिप्पण्या करीत असतात. मात्र, एखाद्या प्रकरणी तक्रार आल्यानंतर त्या तक्रारीतून जर दखलपात्र गुन्हा स्पष्ट होत असेल तर ती तक्रार निश्चितच नोंद केली जाते. (खास प्रतिनिधी)

Web Title: DG's assurance to free party investigations in Chodankar case