शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

आठ माइनस्वीपर युद्धनौका बांधण्याचे

By admin | Updated: December 1, 2014 02:11 IST

दक्षिण कोरियासोबतचा व्यवहार रद्द केल्यानंतर इंटेग्रिटी बॉण्डचे ३ कोटीही जप्त

पणजी : नौदलासाठी माइनस्वीपर युद्धनौका खरेदीचा दक्षिण कोरियासोबतचा व्यवहार रद्द केल्यानंतर इंटेग्रिटी बॉण्डचे ३ कोटी रुपयेही जप्त करण्यात आले आहेत. आठ माइनस्वीपर युद्धनौका गोवा शिपयार्डमध्ये बांधल्या जातील, अशी माहिती केंद्रीय संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी येथे पत्रकार परिषदेत दिली. दक्षिण कोरियाच्या कांग्नम कॉर्पोरेशनने केंद्रीय संरक्षण मंत्रालयासोबत २७00 कोटींच्या दोन माइन काउंटर नौकांबाबत करार केला होता. व्यवहारात वाटाघाटींसाठी एजंटांनी कंपनीचा वापर केला, या कारणास्तव हा व्यवहार रद्द करण्यात आला. पर्रीकर यांनी संरक्षणमंत्री बनल्यानंतर घेतलेला हा पहिला मोठा निर्णय होता. स्वदेशी तंत्रज्ञानावर अधिकाधिक भर दिला जात आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. ‘मेक इन इंडिया’ मोेहिमेचा भाग म्हणून अधिकाधिक भारतीय तंत्रज्ञान वापरण्यात येणार आहे. पर्रीकर म्हणाले की, यापूर्वी अशाच पद्धतीच्या नौका विदेशातून आणल्या जात होत्या आणि येथे मॉडिफाय केल्या जात होत्या. शक्य तेथेच विदेशी तंत्रज्ञान घेतले जाईल; कारण पूर्णपणे स्वदेशी बनावटीच्या युद्धनौका तयार करणे शक्य नाही. उच्च तंत्रज्ञानापुरतेच विदेशी सहकार्य मर्यादित ठेवले जाईल. युद्ध आणि ऊर्जा सुरक्षा या दोन गोष्टी अशा आहेत, की या बाबतीत स्वयंपूर्णता आवश्यक आहे. कल्याणकारी उपायांना गती संरक्षण दलात वाढत्या आत्महत्यांबाबत विचारले असता, जवानांसाठी कल्याणकारी उपायांना आपण गती देणार आहे. शस्त्र खरेदीपेक्षा ते महत्त्वाचे आहे. शस्त्र हाती धरणारा जवान मजबूत असला पाहिजे, असे पर्रीकर म्हणाले. आत्महत्यांच्या कारणाची चौकशी करण्यास आपण सैन्य दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना सांगितले आहे. योग्य व्यवस्थापन केल्यास वेगळ्या पद्धतीने हा प्रश्न सोडवता येईल, असे मतही त्यांनी मांडले. गोव्यात नौदलाच्या जवानांसाठी ७00 ते ८00 सदनिका बांधल्या जात आहेत. हे काम संथगतीने चालू आहे. या कामाचा आढावा घेतला जाईल. जवानांमध्ये एकटेपणा तसेच कुटुंबापासून दूर राहणे ही आत्महत्येची कारणे आहेत. २0११ पासून संरक्षण दलात आत्महत्येची ४४९ प्रकरणे घडल्याचे अलीकडेच पर्रीकर यांनी संसदेत सांगितले होते. दरम्यान, खासदार सीताराम येचुरी यांनी केलेल्या आवाहनाबद्दल विचारले असता पर्रीकर म्हणाले, देशाच्या संरक्षणाला प्राधान्य देऊन देशहिताचेच निर्णय घेतले जातील. (प्रतिनिधी)