फोंडा पोटनिवडणुकीत काँग्रेसचे केतन भाटीकर सर्वांत श्रीमंत उमेदवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2026 13:35 IST2026-03-25T13:35:02+5:302026-03-25T13:35:39+5:30

आम आदमी पक्षाचे गीतेश नाईक मालमत्तेच्या बाबतीत तिसऱ्या स्थानावर आहेत.

congress ketan bhatikar is the richest candidate in the ponda bypoll election 2026 | फोंडा पोटनिवडणुकीत काँग्रेसचे केतन भाटीकर सर्वांत श्रीमंत उमेदवार

फोंडा पोटनिवडणुकीत काँग्रेसचे केतन भाटीकर सर्वांत श्रीमंत उमेदवार

लोकमत न्यूज नेटवर्क, फोंडा : पोटनिवडणुकीसाठी अर्ज दाखल केलेल्या तिन्ही उमेदवारांमध्ये भाजपचे रितेश नाईक हे सर्वात श्रीमंत उमेदवार असतील असे वाटले होते, मात्र काँग्रेसचे डॉ. केतन भाटीकर यांची मालमत्ता त्यांच्यापेक्षा साडेतीन कोटीने जास्त ठरली आहे. आम आदमी पक्षाचे गीतेश नाईक मालमत्तेच्या बाबतीत तिसऱ्या स्थानावर आहेत.

अर्ज दाखल करताना देण्यात आलेल्या प्रतिज्ञापत्रात डॉ. केतन भाटीकर यांनी ४ कोटी ८८ लाख एवढी मालमत्ता दाखवली आहे तर रितेश नाईक यांनी १ कोटी ५५ लाख एवढी मालमत्ता जाहीर केली आहे. आम आदमी पक्षाचे गीतेश नाईक यांनी ७२ लाख रुपयाची मालमत्ता प्रतिज्ञापत्रात जाहीर केली आहे. 

प्रतिज्ञापत्रानुसार भाटीकर यांनी बिगर कृषी जमीन, व्यावसायिक दुकाने, सदनिका या स्थावर मालमत्तेची किंमत ३.८० कोटी एवढी आहे. जंगम मालमत्तेत १.०८ कोटी रुपये दाखवण्यात आले आहेत. यामध्ये दहा बँक खात्यातील ठेवी, गुंतवणूक, वाहने, सोन्याच्या वस्तू आदी गोष्टींचा समावेश होतो. भाटीकर यांच्या नावावर १ कोटी २९ लाख रुपयांचे कर्ज आहे. सन २०२४-२५ आयकर विवरण भरताना त्यांनी वार्षिक उत्पन्न १३ लाख २५ हजार दाखवले आहे.

भाजपचे उमेदवार रितेश नाईक यांनी त्यांच्या नावावर एकही रुपयाची स्थावर मालमत्ता नसल्याचे प्रतिज्ञापत्रात नमूद केले आहे. २०२४-२५ मध्ये आयकर विवरण पत्र भरताना त्यांनी १५.४६ लाख उत्पन्न असल्याचे दाखवले आहे. रोख रक्कम ५२ हजार, बँकेतील ठेवी ७ लाख, म्युच्युअल फंड ७ लाख, पोस्ट ऑफिस व इतर गुंतवणूक १ कोटी ८८ लाख, सोन्याच्या वस्तू १ कोटी ३८ लाख रुपयांच्या आहेत.

आपचे उमेदवार गीतेश नाईक यांनी सुमारे ५७ लाख रुपयाची जंगम मालमत्ता जाहीर केली आहे. यामध्ये त्यांच्या बायकोच्या नावावर असलेल्या जंगम मालमत्तेचा ही समावेश आहे. तीन बँक खात्यातील ठेवी, रोख रक्कम, शेअर्स, वाहने, सोन्याच्या वस्तू अशी मालमत्ता त्यांनी जाहीर केली. १८. ३६ लाख ते देय असल्याचे नमूद करण्यात आले आहे.

 

Web Title : फोंडा उपचुनाव में कांग्रेस के केतन भाटीकर सबसे अमीर उम्मीदवार

Web Summary : कांग्रेस उम्मीदवार केतन भाटीकर फोंडा उपचुनाव में 4.88 करोड़ रुपये की संपत्ति के साथ सबसे अमीर हैं, भाजपा के रितेश नाइक (1.55 करोड़ रुपये) से आगे। आप के गीतेश नाइक ने 72 लाख रुपये की संपत्ति घोषित की। भाटीकर पर 1.29 करोड़ रुपये की देनदारी है।

Web Title : Ketan Bhatikar richest candidate in Fonda by-election: Report

Web Summary : Congress candidate Ketan Bhatikar is the wealthiest in Fonda by-election with ₹4.88 crore assets, surpassing BJP's Ritesh Naik (₹1.55 crore). AAP's Gitesh Naik declared ₹72 lakh worth of assets. Bhatikar has liabilities of ₹1.29 crore.