शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

व्यावसायिकदृष्ट्या मराठी चित्रपट मागेच

By admin | Updated: November 24, 2014 01:28 IST

नंदू माधव : नव्या दमाच्या निर्मात्यांमुळे आशादायक चित्र

सुखदेव नारायणकर-पणजी : मराठी चित्रपट बदलतो आहे हे खरे आहे; मात्र व्यावसायिकदृष्ट्या ती एक चळवळ झाली आहे असे मात्र म्हणता येणार नाही. त्याकरिता सार्वत्रिक प्रयत्नांची गरज आहे. नव्या दमाचे चेहरे आता चित्रपट निर्मितीत येत असल्याने आगामी काळात अधिक आशादायक चित्र दिसेल, असा विश्वास मराठी चित्रपट अभिनेते नंदू माधव यांनी व्यक्त केला. इफ्फीनिमित्त गोव्यात आलेल्या या कसदार अभिनेत्याने ‘लोकमत’शी मनमोकळा संवाद साधला. नंदू माधव म्हणाले, मराठी चित्रपटांना चळवळीचे स्वरुप आले आहे असं म्हणणं धाडसाचं ठरेल. नाटक, पथनाट्य हा चळवळीचा भाग झाला; पण मराठी चित्रपटांमध्ये हा बदलही होत असल्याची काही सुचिन्हे दिसायला लागली आहेत. चळवळीचेच म्हणत असाल तर बंगालमध्ये चित्रपटांची चळवळ रुजली. नव्या दमाच्या दिग्दर्शकांमुळे सध्या मराठी चित्रपटसृष्टीस चांगले दिवस येत आहेत. नवे आशय विषय आणि तंत्रज्ञान यामुळे चित्रपटांची समज वाढीस लागत आहे हे चांगले लक्षण आहे. जागतिक स्तरावर मराठी चित्रपटांची दखल घेतली जात आहे हा मोठ्या बदलांचाच भाग आहे. ते म्हणाले, शासनाने थेट मदत देण्यापेक्षा जर मराठी चित्रपटांसाठी स्वत:ची हक्काची चित्रपटगृहे निर्माण केली तर मराठी चित्रपटांचे अनेक प्रश्न खऱ्या अर्थाने सुटतील. निर्मितीमूल्यांबरोबरच त्याच्या मार्केटिंगकडे विशेषत्वाने पाहण्याची गरज आहे. स्वत:चं घर असल्यावर मला जागा द्या, असं म्हणायची वेळच मराठी चित्रपटांवर येणार नाही. इफ्फीत विषयकेंद्रित चित्रपट पाहावयास मिळतात. त्यामुळे विविध देशातील सामाजिक, आर्थिक, राजकीय संस्कृती पाहावयास मिळते. नव्या दिग्दर्शकांच्या सामाजिक जाणिवा वाढण्यासाठी याचा निश्चित लाभ होतो. वेगळ्या संकल्पना, वेगळ्या समस्यांना भिडण्याची ताकद निर्माण होते. परिणामी त्याचे दृश्य परिणाम चित्रपटांच्या निर्मितीत दिसतात. चित्रपटांच्या दर्जा वाढीस ही गोष्ट अनुकूल आहे, असे निरीक्षण त्यांनी नोंदविले. गेल्या काही वर्षांपासून मराठी चित्रपटांची इफ्फीतील संख्याही वाढत आहे हेच आश्वासक चित्र आहे. गोव्यातही मराठी चित्रपट आता बऱ्यापैकी झळकू लागले आहेत. इंडियन पॅनोरमा विभागातील मराठी चित्रपटांची संख्या लक्षात घेता हे बदल दुर्लक्षित करण्यासारखे नाहीत, असेही त्यांनी सांगितले.