बाणस्तारी अपघातप्रकरणी आरोपपत्र ही भाजपची देणगी: अमित पालेकर
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2025 08:12 IST2025-10-15T08:11:32+5:302025-10-15T08:12:01+5:30
बाणस्तारी अपघात प्रकरणातील मुख्य संशयिताला समन्स उशिराने जारी झाले.

बाणस्तारी अपघातप्रकरणी आरोपपत्र ही भाजपची देणगी: अमित पालेकर
लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : बाणस्तारी अपघात प्रकरणी पोलिसांनीआपल्याविरोधात भारतीय दंडसंहिता कलम १२० (बी) अंतर्गत कारस्थान रचण्याचा आरोप ठेवून आरोपपत्र सादर केले आहे. भाजप सरकारची मिळालेली ही देणगी असून, ते पूर्ण राजकीय प्रेरित असल्याची टीका आम आदमी पक्षाचे नेते अॅड. अमित पालेकर यांनी केली आहे.
मी वकील म्हणून मागील २७वर्षापासून प्रॅक्टिस करीत आहेत. न्यायालयात आपण वकील म्हणून जातो. मात्र, यावेळी आरोपी म्हणून न्यायालयात उभा होतो. राजकारणात आल्यामुळे भाजपने मला दिलेली ही एकप्रकारची देणगीच असल्याचा आरोप पालेकर यांनी केला. बाणस्तारी अपघात प्रकरणातील मुख्य संशयिताला समन्स उशिराने जारी झाले.
या अपघात प्रकरणी पोलिसांनी आपल्याविरोधात भारतीय दंडसंहिता कलम १२० (बी) अंतर्गत कारस्थान रचण्याचा आरोप ठेवला. कलम १२० (बी) म्हणजे कटकारस्थान रचणे. आता अपघात करण्यासाठी कटकारस्थान कसे रचणार. कदाचित अपघात प्रकरणात एखाद्या विरोधात या कलमाखाली गुन्हा नोंद होण्याचे हे पहिलेच प्रकरण असल्याची टीका त्यांनी केली.
सरकार जे सांगते, तेच पोलिस ऐकतात...
आम्हाला एक कायदा व सरकारच्या लोकांना एक कायदा अशी स्थिती सध्या आहे. अपघात प्रकरणातील मुख्य ** संशयितांना लावलेले कलम मला लावले आहे. यावरून हे सर्व राजकीय प्रेरित असल्याचे स्पष्ट होते. पोलिस सरकारचे ऐकत आहे. अपघातप्रकरणी न्यायालयात सादर करणारे आरोपपत्र खरे तर कमी पानांचे असते. मात्र, बाणस्तारी अपघात प्रकरणी २०० हून अधिक पानांचे आरोपपत्र सादर पोलिसांनी केल्याची टीका पालेकरांनी केली.
----००००----