शहरं
Join us  
Trending Stories
1
टीएमसी की भाजप... पश्चिम बंगालमध्ये महिला अन् पुरुषांची पहिली पसंती कुणाला?  'हे' आकडे सत्तेचं गणित बदलणार
2
IPL 2026 : MI चा संघर्ष संपता संपेना! तरीही स्वबळावर Playoffs ची आशा जिवंत; जाणून घ्या समीकरण
3
कोल्हापूर जिल्ह्यातील मुलींच्या शोषण प्रकरणाला वेगळे वळण, बजरंग दलाच्या पदाधिकाऱ्याला पिस्तुलाचा धाक दाखवत जीवे मारण्याची धमकी
4
नागपुरात ‘रेडिएशन’ची धमकी; संघ मुख्यालय-स्मृतिमंदिरात ‘रेडिओॲक्टिव्ह’ पदार्थ टाकल्याचा दावा, पोलीस आयुक्तांना निनावी पत्र
5
SRH विरुद्ध नमन धीरच्या चुकांवर चुका! हेडला तीनदा जीवनदान; तिथंच MI च्या हातून सामना निसटला
6
धारमध्ये भीषण अपघात; ३५ मजुरांनी भरलेली पिकअप उलटून स्कॉर्पिओला धडकली; १२ जणांचा जागीच मृत्यू, १५ हून अधिक जखमी
7
ममता बॅनर्जी यांचा २० हजार मतांनी पराभव होणार! सुवेंदू अधिकारी यांचा दावा; भाजपला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
8
IPL 2026 : हेडच्या वादळानंतर क्लासेनचा क्लास शो! SRH कडून पराभवानंतर MI साठी वाजली धोक्याची घंटा
9
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
10
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
11
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
12
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
13
कोण आहे Allah Ghazanfar? अभिषेक शर्माचं वादळ रोखत ईशान किशनला गोल्डन डकवर धाडलं तंबूत!
14
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
15
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
16
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
17
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
18
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
19
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
20
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
Daily Top 2Weekly Top 5

कॅसिनोंना प्रोत्साहन नकोच : श्रीपाद नाईक

By admin | Updated: May 28, 2014 01:57 IST

कॅसिनोंना प्रोत्साहन नकोच : श्रीपाद नाईक

जयशंकर गुप्ता -नवी दिल्ली : वाराणसीतील घाटांची सफाई आणि सौंदर्यीकरणासाठी १८ कोटी मंजूर करण्यात आल्याची घोषणा मंगळवारी केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी केली. नाईक यांनी पर्यटन व संस्कृती खात्याचा स्वतंत्र ताबा स्वीकारल्यानंतर पर्यटनाला प्रोत्साहन देण्यासाठी या योजनेची घोषणा केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रचारादरम्यान वाराणसीतील घाटांच्या दुर्दशेचा उल्लेख करून त्यांच्या दुरुस्तीची व सौंदर्यीकरणाची गरज असल्याचे म्हटले होते. कॅसिनोंना प्रोत्साहन देण्यास आपण अनुकूल नसल्याचे श्रीपाद नाईक यांनी या वेळी ‘लोकमत’शी बोलताना स्पष्ट केले. गंगेचे पावित्र्य आणि सफाई टिकविण्याबरोबरच किनार्‍यावरील शहरे देशी व परदेशी पर्यटकांसाठी आकर्षण केंद्रे बनविण्याला आपण प्राधान्य देणार असल्याचे नाईक यांनी सांगितले. देशातील पर्यटकांची संख्या वाढविणे तसेच देशी-परदेशी पर्यटकांना सुरक्षित, सुविधायुक्त अशी पर्यटनस्थळे असण्यावर यापुढे भर दिला जाईल, असे नाईक यांनी सांगितले. देशातील अनेक राज्यांमध्ये पर्यटकांना आकर्षित करू शकतील अशी काही स्थळे आहेत. अधिकारी व संबंधित तज्ज्ञांच्या साहाय्याने ही राज्ये पर्यटनविषयक योजना तयार करतील. राज्यांत तसेच केंद्रीय पातळीवर पर्यटन गाइड्सना प्रशिक्षण देण्यासाठी खास संस्था स्थापन करण्याचा विचार आहे. भारतीय संस्कृतीची परदेशात ओळख करून देण्यासाठी तेथे रोड शो आयोजित करण्यात येतील, असे ते म्हणाले. पर्यटनमंत्री या नात्याने आपण गोव्याप्रमाणेच अन्य राज्यांत पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी कॅसिनोंना प्रोत्साहन देणार आहात का, या प्रश्नाला उत्तर देताना नाईक यांनी सांगितले की, वैयक्तिकरीत्या आपण कॅसिनोंना परवाने देण्याच्या विरोधात आहे; पण हा विषय राज्यांचा आहे. कॅसिनोरूपी जुगारामुळे कोणाचे भले झाले आहे का, असा प्रश्न उपस्थित करून नाईक म्हणाले, हा व्यवसाय हळूहळू बंद व्हायला हवा. गोव्यात कॅसिनो असले, तरी तेथे गोवेकरांना प्रवेश दिला जात नाही, असे त्यांनी सांगितले.