शहरं
Join us  
Trending Stories
1
अरबी समुद्रात पाकिस्तान करणार होता कुरापती; माहिती मिळताच २४ तासांत भारताने उतरवली युद्धनौका
2
कैसे बोगस दाखला बनाया? एमआयएम नगरसेविका सहर शेखकडून शासकीय यंत्रणांची दिशाभूल
3
नाशिकच्या तरुणींना मलेशियात विकण्याचा कट? आयटी कंपनीतील 'त्या' प्रकरणाला मानवी तस्करीचे भयानक वळण
4
Mumbai Traffic Update: बीकेसीत मेट्रोचा बीम कोसळला! क्रेन उलटल्याने मोठा अपघात; कुर्ला-वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक विस्कळीत
5
आज सोन्या-चांदीच्या किमतीत किती झाला बदल? ऑल टाईम हायवरुन Silver १,६४,८४४ रुपयांनी खाली; सोन्याची किंमत किती?
6
IPL 2026: आधीच KKRची एक सामना जिंकायची मारामार, त्यात अजिंक्य रहाणेला BCCIचा मोठा दणका
7
सुपर डुपर हिट... ‘वंदे भारत’ची कमाल कामगिरी, ९ कोटी प्रवाशांचा प्रवास; २७४ जिल्हे, १६४ सेवा!
8
जुलैपासून पुन्हा वाढणार जगाचं टेन्शन! भारतावरही होणार परिणाम, अमेरिकेनं स्पष्ट शब्दांत दिले संकेत
9
Share Market: शेअर बाजारात तुफान तेजी! सेंसेक्समध्ये १२०० अंकांची उसळी; निफ्टी २४,२०० च्या वर; 'या' शेअर्समध्ये जोरदार रॅली
10
२१ तास चर्चा करूनही अमेरिका-इराणमध्ये करार का झाला नाही? व्हान्स यांनी सांगितली Inside Story
11
शेतकऱ्यांच्या घामाच्या पैशांवर पीक विमा कंपन्या मालामाल, नऊ वर्षांत कमावले ७३,६३० काेटी
12
विकसित भारतासाठी प्रगती, निसर्ग आणि संस्कृतीचा त्रिवेणी संगम आवश्यक: पंतप्रधान नरेंद्र मोदी
13
भन्साळींच्या 'रोमँटिक' प्रोजेक्टसाठी शाहरुखचा 'ग्रीन सिग्नल'? वयानुसार भूमिका करणार किंग खान
14
SIP साठी कोणती तारीख आहे बेस्ट? १ की १५? जास्त परतावा मिळवण्यासाठी 'या' एका गोष्टीवर द्या लक्ष
15
राशीभविष्य, १५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती संभवते, दांपत्य जीवनात आनंद दरवळेल, लाभ संभवतात!
16
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
17
दादर-रत्नागिरी पॅसेंजर पुन्हा दादरवरून धावणार? व्यवहार्यता अहवालावरच पुढील निर्णय अवलंबून
18
कल्याणच्या पेडलरने पोहोचवले कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज, सहा अटकेत, पुरवठादार आनंद पटेलला नाट्यमयरीत्या अटक
19
इराणची अमेरिकेकडून कोंडी; १० हजार सैनिक केले तैनात, २४ तासांत एकही जहाज अमेरिकेच्या घेऱ्यातून पुढे नाही
20
मकर संक्रांती ते चैत्र पौर्णिमा; चार महिने चालणार हरिद्वारचा अर्धकुंभ, वाचा शाही स्नानाचे संपूर्ण वेळापत्रक
Daily Top 2Weekly Top 5

केरी-तेरेखोलमधील कोळसा वाहतूक बेकायदाच

By admin | Updated: March 15, 2015 02:58 IST

मांद्रे : केरी-तेरेखोल खाडीतून बेदरकारपणे कोळसा वाहतूक करणाऱ्या व्हाईड ओर्चेड बार्ज वाहतूक कंपनीने गोवा बंदर आणि कप्तान

मांद्रे : केरी-तेरेखोल खाडीतून बेदरकारपणे कोळसा वाहतूक करणाऱ्या व्हाईड ओर्चेड बार्ज वाहतूक कंपनीने गोवा बंदर आणि कप्तान खात्याकडे कोणत्याच प्रकारचा पत्रव्यवहार न करता व सरकारलाही न जुमानता कोळसा वाहतूक चालू ठेवल्याची आरटीआयद्वारे माहिती मिळाल्याचे केरी-तेरेखोल-पालये ग्राम बचाव समितीचे निमंत्रक सचिन परब यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. केरी-तेरेखोल-पालये ग्राम बचाव समितीने केरी फेरी धक्का परिसरात शनिवार १४ मार्च रोजी आयोजिलेल्या पत्रकार परिषदेला समितीचे निमंत्रक परब यांच्यासमवेत समितीचे सल्लागार अ‍ॅड. प्रसाद शहापूरकर, तेरेखोलचे फा. ज्योविनो, शशिकांत पेडणेकर, मिलिंद तळकर, आगुस्तीन डिसोझा, उल्हास पेडणेकर, रोहिदास पेडणेकर व समितीचे इतर सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते. परब म्हणाले, की ३ मार्च २०१५ रोजी बंदर व कप्तान खात्याकडे माहिती हक्क कायद्याद्वारे अर्ज सादर करून व्हाईड ओर्चेड कंपनीने परवान्यासाठी केलेल्या अर्जाची प्रत व कोळसा वाहतुकीसंदर्भातील तपशील देण्याची मागणी केली होती. बंदर कप्तान खात्याकडून ‘कोरा’ अहवाल देण्यात आला. संबंधित कंपनीने कोणत्याच प्रकारचा पत्रव्यवहार केला नसल्याने कंपनीला कोळसा वाहतूक परवाना देण्याचा प्रश्नच उद््भवत नसल्याचे त्यातून स्पष्ट होत असल्याचे परब यांनी नमूद केले. यापुढे संबंधित व्हाईड ओर्चेड कंपनीने संबंधित खात्याकडे परवाना मागण्यासाठी अर्ज केल्यास तो रद्दबातल ठरवून परवाना देऊ नये, अशी मागणी परब यांनी केली. २२ मार्च रोजी सत्यनारायण महापूजेचे आयोजन करून लोकजागृती करण्याचा निर्णय घेण्यात आला. समितीकडून ७ फेब्रुवारी रोजी पेडणे पोलीस निरीक्षकाकडे बेकायदेशीर कोळसा बार्ज वाहतुकीसंदर्भात तक्रार दाखल करण्यात आली होती. पोलीस निरीक्षकांनी लागलीच ९ फेब्रुवारी रोजी बंदर कप्तान खात्याकडे पत्रव्यवहार चालू केला. मात्र, संबंधित खात्याकडून एका महिन्याच्या अंतराने त्याची दखल घेऊन संंबंधित कंपनीकडून कोणताच कायदेशीर मार्ग अवलंबिला गेला नसल्याचे स्पष्ट करणारा अहवाल दिल्याचे परब म्हणाले. अ‍ॅड. प्रसाद शहापूरकर, फा. ज्योवीनो यांनीही या वेळी मत मांडले. (प्रतिनिधी)