शहरं
Join us  
Trending Stories
1
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू 1 मे रोजी अयोध्या दौऱ्यावर, रामललांचं दंर्शन, हनुमानगढी मंदिरात आरती अन्...; असा असेल संपूर्ण कार्यक्रम!
2
भाजपच्या पीयूष गोयल यांच्याविरोधात भूषण पाटील; काँग्रेसकडून राज बब्बर यांनाही उमेदवारी...
3
KL Rahul च्या नेतृत्वासमोर मुंबई इंडियन्स ढेपाळले; रोहित ४, तर हार्दिक गोल्डन डकवर आऊट 
4
गडचिरोली सीमेवर चकमक; १० नक्षलवाद्यांचा खात्मा 
5
Video: पाळीव कुत्र्याचा सहा वर्षीय चिमुकलीवर हल्ला; धक्कादायक व्हिडिओ व्हायरल...
6
'नरेंद्र मोदी मोठ्या मनाचा नेता, एक मेसेज पाठवला अन् काम झालं', काँग्रेसच्या माजी नेत्यानं सांगितला किस्सा
7
“भटकती आत्मा तर नरेंद्र मोदीच, प्रधानमंत्री कमी अन् प्रचारमंत्रीच जास्त”; नाना पटोलेंची टीका
8
आनंदाची बातमी...! ₹75000 पार जाणाऱ्या Gold Price मध्ये पुन्हा मोठी घसरण, पटा-पट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट 
9
देशात फक्त मोदी पॅटर्न चालतो, बाकी सगळे भंगारात; एकनाथ शिंदेंचा विरोधकांवर प्रहार
10
BANW vs INDW: भारताचा झंझावात कायम; पावसाची 'बॅटिंग' अन् बांगलादेशचा सलग दुसरा पराभव
11
दुर्दैवी! प्रसूती दरम्यान 'बत्ती गूल'; टॉर्चच्या प्रकाशात सिझर पण बाळासह आईचा मृत्यू
12
भारतीय संघ दोन तुकड्यांमध्ये अमेरिकेला रवाना होणार, पहिली बॅच २१ मे रोजी तर... 
13
अरविंद केजरीवालांना ठीक निवडणुकीपूर्वी का अटक केले? सुप्रीम कोर्टाचा ED ला थेट सवाल...
14
अरविंद सावंतांविरोधात तिकीट मिळालेल्या यामिनी जाधव यांची अशी आहे राजकीय कारकीर्द
15
कल्याणमध्ये तिरंगी लढत होणार; लोकसभेसाठी वंचितकडून आणखी ३ उमेदवारांची घोषणा
16
Team India for T20WC 2024 : वर्ल्ड कप स्पर्धेसाठी भारताचा संघ जाहीर, हार्दिक पांड्या उप कर्णधार, KL Rahul चा पत्ता कट
17
मोठी अपडेट्स : Rinku Singh ची होणार १५ मध्ये एन्ट्री? भारतीय संघात केला जाऊ शकतो बदल
18
सोढी बेपत्ता, अय्यर टेन्शनमध्ये; 'तारक मेहता...' अभिनेते तनुज महाशब्देंनी दिली प्रतिक्रिया
19
Rajnath Singh : "डायनासोरप्रमाणे काँग्रेस पृथ्वीवरुन नाहीशी होईल, हे बुडणारं जहाज"; राजनाथ सिंह यांचं टीकास्त्र
20
सांगलीत मोठा ट्विस्ट; विशाल पाटील यांची ताकद वाढली! वंचित बहुजन आघाडीने दिला पाठिंबा

घराणेशाहीबाबतचा आपला नियम भाजपा गोव्यात मोडणार, कुटुंबात एकापेक्षा जास्त जणांना उमेदवारी देणार, देवेंद्र फडणवीसांनी दिले संकेत

By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2021 6:03 PM

Devendra Fadnavis, Goa BJP News: काही भाजप आमदार आपल्या कुटुंबातील सदस्यांना उमेदवारी मिळविण्यासाठी प्रयत्नरत आहेत याकडे लक्ष वेधले असता पत्रकार परिषदेत उत्तर देताना फडणवीस यांनी हे विधान केले

पणजी - कुटुंबातील एकाच व्यक्तिला तिकीट हे भाजपचे धोरण आहे परंतु गोवा याला अपवाद असू शकतो. कुटुंबात कितीजणांना उमेदवारी द्यावी तसेच युतीबाबतचा निर्णय पक्षाचे संसदीय मंडळच घेईल, असे भाजपचे गोवा निवडणूक प्रभारी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी सांगितले. काही भाजप आमदार आपल्या कुटुंबातील सदस्यांना उमेदवारी मिळविण्यासाठी प्रयत्नरत आहेत याकडे लक्ष वेधले असता पत्रकार परिषदेत उत्तर देताना फडणवीस म्हणाले की, ‘ गोव्यात वेगळ्या प्रकारचे अपवाद वर्षोन्वर्षे चालत आले आहेत. याआधीही असे अपवाद येथे आहेत.’ (BJP will break its rule on dynastic rule in Goa, will nominate more than one person in the family, hints Devendra Fadnavis)

‘आमदार का फुटले?काँग्रेसने आत्मपरीक्षण करावे’येत्या निवडणुकीसाठी भाजप अन्य पक्षाकडे युती करणार आहे का, या प्रश्नावर फडणवीस म्हणाले की, यासंबंधी निर्णय संसदीय मंडळ घेईल. भाजपने नेहमीच रीती आणि नीतीचे राजकारण केले आहे. काँग्रेसचे आमदार फुटून भाजपने का आले याचे आत्मपरीक्षण काँग्रेसने करायला हवे.’फडणवीस म्हणाले की, ‘ अलीकडेच झालेल्या पालिका निवडणुकांमध्ये तसेच त्याआधी जिल्हा पंचायत निवडणुकांमध्येही भाजपला लोकांनी बहुमताने निवडून दिले आहे.’ एका प्रश्नावर ते म्हणाले की, ‘ दिवंगत पर्रीकरांनंतर मुख्यमंत्री म्हणून डॉ. प्रमोद सावंत यानी बºयापैकी कामगिरी बजावली आहे. कोविड महामारीच्या काळात त्यांनी चोख काम केले. शंभर टक्के लसीकरणाचा मान गोव्याने मिळवला.’प्रमोद सावंत हेच मुख्यमंत्री असतील का, या प्रश्नावर फडणवीस म्हणाले की,‘ त्याबाबतचा निर्णय पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तसेच संसदीय मंडळ घेणार आहे.’

 ‘ भाजपमध्ये बंडाळी नाहीच’निवडणुकीच्या तोंडावर भाजपमध्ये बंडाळी असल्याचे वृत्त फडणवीस यांनी फेटाळून लावले. ते म्हणाले की, ‘ मनभिन्नता असू शकते, परंतु बंडाळी निश्चितच नाही. पक्ष आणि सरकार एकत्रित चेहरा म्हणून लोकांसमोर जाईल. मुख्यमंत्री, मंत्री, पदाधिकारी, कार्यकर्ते सर्वचजण एकदिलाने वावरणार असून यावेळी पूर्ण बहुमताने ऐतिहासिक विजय भाजपला मिळणार आहे.’

 पर्रीकरांची उणीव भासेलफडणवीस म्हणाले की,‘येत्या निवडणुकीत दिवंगत पर्रीकर आमच्यासोबत नाहीत ही उणीव भासेल. परंतु पर्रीकरांच्या निधनानंतर डॉ. प्रमोद सावंत यांनीही चांगली कामगिरी बजावली आहे. पर्रीकरांनी विकासाची मुहुर्तमेढे रोवली ती सावंत पुढे नेत आहेत. पर्यटन आणि रोजगार निर्मिती यातून राज्याला विशेष फायदा होणार आहे. ‘प्रशासन आपल्या दारी’ या उपक्रमातून सरकार जनतेशी थेट कनेक्ट होत आहे. गोवा भाजप निवडणुकीसाठी पूर्ण तयारीत आहे. 

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसBJPभाजपा