भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन ३० व ३१ रोजी गोवा भेटीवर

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2026 07:37 IST2026-01-22T07:36:07+5:302026-01-22T07:37:56+5:30

नबीन यांच्या आगमनाबद्दल प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी पत्रकारांना माहिती दिली.

bjp new national president nitin nabin to visit Goa on 30th and 31st | भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन ३० व ३१ रोजी गोवा भेटीवर

भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन ३० व ३१ रोजी गोवा भेटीवर

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी: भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन हे येत्या ३० व ३१ रोजी गोवा भेटीवर येणार आहेत. या दोन दिवसीय भेटीत ते कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करतील. तसेच आमदार, मंत्र्यांच्या बैठकाही त्यांच्यासोबत होणार आहेत. नबीन यांच्या आगमनाबद्दल प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी पत्रकारांना माहिती दिली.

मुख्यमंत्री प्रमोद सावंत, प्रदेशाध्यक्ष दामू नाईक तसेच भाजपचे पदाधिकारी, आमदार, मंत्री मिळून २० जणांची टीम दिल्लीमध्ये होती. हे सर्वजण बुधवारी रात्री गोव्यात परतले. बुधवारी नबीन यांनी दिल्लीत भाजपच्या सर्व राज्यांमधील प्रदेशाध्यक्षांची बैठक बोलावली होती. त्या बैठकीसाठी दामू नाईक उपस्थित होते. २०२७ च्या आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने पक्षाचे नबीन राष्ट्रीय अध्यक्ष गोव्यातील कार्यकर्त्यांना आपल्या या भेटीत काय कानमंत्र देतात, याबद्दल सर्वांनाच उत्सुकता आहे.

Web Title : भाजपा के नए राष्ट्रीय अध्यक्ष नितिन नबीन गोवा दौरे पर

Web Summary : भाजपा के नए राष्ट्रीय अध्यक्ष नितिन नबीन 30 और 31 तारीख को गोवा का दौरा करेंगे। वे कार्यकर्ताओं का मार्गदर्शन करेंगे और विधायकों और मंत्रियों के साथ बैठकें करेंगे, जिसमें 2027 के चुनावों पर ध्यान केंद्रित किया जाएगा।

Web Title : BJP's New National President Nitin Nabin to Visit Goa

Web Summary : BJP's newly appointed National President, Nitin Nabin, will visit Goa from the 30th to 31st. He will guide party workers and hold meetings with MLAs and ministers, focusing on the 2027 elections.