शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी तुम्हाला विकसित भारत देऊन जाईन, ही माझी गॅरंटी', शिवतीर्थावर नरेंद्र मोदींचं मोठं विधान
2
तुम्ही संपत्तीचे वारसदार तर आम्ही विचारांचे वारसदार, एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल
3
एकाधिकारशाही संपवण्यासाठी भाजपाला हद्दपार करण्याची गरज, शरद पवारांचा घणाघात
4
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा, संविधान, गडकिल्ले...राज ठाकरेंच्या PM मोदींकडे 'या' मागण्या
5
'उद्धव ठाकरेंनी तमाम हिंदू बांधवांनो म्हणणे सोडून दिले', देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
6
PM मोदींच्या नेतृत्वात महाराष्ट्रासह देशाचा विकास झाला, अजित पवारांचा विरोधकांवर निशाणा
7
"उद्धवजी महाराष्ट्रात चालणार नाहीत तुमचे नखरे, कारण आमच्यासोबत आलेत राज ठाकरे", रामदास आठवलेंची कवितेतून टीका
8
जसप्रीत बुमराहला विश्रांती, अर्जुन तेंडुलकरला संधी; मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात बरेच बदल
9
रश्मिका मंदानाकडून 'अटल सेतू'चं कौतुक; आदित्य ठाकरेंचा अभिनेत्रीला सल्ला अन् सरकारवर टीकास्त्र
10
गौतम गंभीर टीम इंडियाचा नवा कोच! द्रविडची रिप्लेसमेंट म्हणून BCCI प्रयत्नशील
11
शरीरातील बॅड कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी रामबाण आहे हळद आणि तुळस! असा करा वापर
12
मी माझा मुलगा तुमच्याकडे सोपवतेय, तो तुम्हाला निराश करणार नाही; रायबरेलीत सोनिया गांधी भावूक
13
Fact Check: पंतप्रधान मोदींच्या विजयाचा दावा करणारा राहुल गांधींचा 'तो' Video एडिटेड!
14
चांदीचा विक्रम, ₹86271 वर पोहोचली; सोनं घसरलं! पटापट चेक करा लेटेस्ट रेट
15
ममता बॅनर्जी आणि अभिषेक बॅनर्जी यांना जीवे मारण्याची धमकी!
16
दिल्ली मद्य घोटाळा; ED ने अरविंद केजरीवालांसह AAP विरोधात दाखल केली चार्जशीट
17
'नरेंद्र मोदींना आता जिल्हा परिषद, ग्रामपंचायतींच्या वॉर्डनिहाय सभांचं निमंत्रण दिलं पाहिजे', ठाकरे गटाचा टोला
18
भन्साळींच्या 'बाजीराव मस्तानी'साठी अलका कुबल यांनी दिलेलं ऑडिशन; 'या' एका गोष्टीमुळे गमावला सिनेमा
19
...अन् आम्ही काय करू शकतो हे जगाला दाखवून दिलं; जय शाह यांनी सांगितली पॉवर
20
"मी निवृत्त झालो नाही किंवा...", ब्रिजभूषण शरण सिंहांच्या वक्तव्याबाबत लोकांमध्ये चर्चा 

बांधकाम बंदीचा आदेश गोव्याला लागू नाही

By ऑनलाइन लोकमत | Published: September 02, 2018 8:57 PM

पणजी : घनकचरा व्यवस्थापनाच्या बाबतीत अहवाल सादर न केल्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने दिलेला बांधकाम बंदीचा आदेश हा गोव्याला लागू होत नसल्याचे अतिरिक्त सॉलिसिटर जनरल आत्माराम नाडकर्णी यांनी म्हटले आहे. घनकचरा व्यवस्थापनासंबंधी अनेक आदेश देऊनही त्या संबंधी अहवाल सादर न केल्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने काही राज्यांत बांधकाम बंदीचा आदेश दिला आहे. या संबंधी अनेकवेळा ...

पणजी : घनकचरा व्यवस्थापनाच्या बाबतीत अहवाल सादर न केल्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने दिलेला बांधकाम बंदीचा आदेश हा गोव्याला लागू होत नसल्याचे अतिरिक्त सॉलिसिटर जनरल आत्माराम नाडकर्णी यांनी म्हटले आहे. 

घनकचरा व्यवस्थापनासंबंधी अनेक आदेश देऊनही त्या संबंधी अहवाल सादर न केल्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने काही राज्यांत बांधकाम बंदीचा आदेश दिला आहे. या संबंधी अनेकवेळा इशारे देऊन व दंड ठोठावूनही त्याची गांभिर्याने दखल न घेतल्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने हा बांधकाम बंदीचा आदेश दिला आहे. गोवा सरकारकडून काही दिवसांपूर्वीच घनकचरा व्यवस्थापनाबाबतच्या कामांचा सर्वोच्च न्यायालयात अहवाल सादर केला होता. त्यामुळे गोवा या आदेशापासून वाचला आहे. राज्याचे सॉलिसिटर जनरल आत्माराम नाडकर्णी यांनीही त्याला पुष्टी दिली आहे. हा आदेश केवळ चार राज्यांना लागू होत असून त्यात गोवा नसल्याचे ते लोकमतशी बोलताना म्हणाले. 

या पूर्वीच्या सुनावणीच्यावेळी घनकचरा व्यवस्थापनासंबंधी सद्यस्थितीचा अहवाल सादर न करण्यासाठी  गोवा, मेघालय, पश्चिम बंगाल, हरयाणा, केरळ, छत्तीसगड, हिमाचल प्रदेश या राज्यांसह  दादरा- नगर हवेली, लक्षद्वीप, दमण आणि पाँडिचेरी या केंद्रशासित प्रदेशात घनकचरा व्यवस्थापनाच्या बाबतीत समाधानकारक प्रगती न झाल्यामुळे  व अहवाल सादर न केल्यामुळे १ लाख रुपये दंड ठोठावण्यात आला होता.

टॅग्स :goaगोवाCentral Governmentकेंद्र सरकारHigh Courtउच्च न्यायालय