शहरं
Join us  
Trending Stories
1
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील आरोपी भावेश भिंडे याला अटक; दोन दिवसांपासून सुरु होता शोध
2
मी फडणवीसांवर काहीच बोलणार नाही, कारण...; उद्धव ठाकरेंनी केली घणाघाती टीका
3
अमेठीतून गेले आता रायबरेलीतूनही जाणार खटा-खट-खटा-खट, पंतप्रधान मोदींचा राहुल गांधींवर हल्लाबोल
4
धक्कादायक! प्रॉपर्टीच्या वादातून नायजेरियात मशिदीत बॉम्बस्फोट; आठ जणांचा मृत्यू, १६ जखमी
5
'संपूर्ण जगाला विश्वास, भारतात BJP चे सरकार स्थापन होणार', PM मोदींचा विरोधकांवर निशाणा
6
Mahindra XUV 3XO चा रेकॉर्ड, अवघ्या एका तासात 50000 बुकिंग!
7
तुम्ही तर रक्ताचे होतात, मग का असं केलं?; छगन भुजबळांचा राज ठाकरेंवर पलटवार
8
मोदी जे बोलतात, त्यातलं १ टक्काही खरं नाही, त्यांचा आत्मविश्वास ढळलाय"; शरद पवारांची टीका
9
T20 World Cup आधी पाकिस्तानची इंग्लंडविरूद्ध तयारी; शोएब मलिकने सांगितला प्लॅन
10
"इंडिया आघाडी फुटणार अन् शहजादे...", पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
11
रायबरेलीत सोनिया गांधी सक्रिय; अखिलेश यादव, राहुल गांधी पोहोचण्यापूर्वीच कार्यकर्त्यांसोबत बैठक!
12
सनरायझर्स हैदराबादविरुद्ध गुजरात टायटन्स सामना रद्द? समोर आले मोठे अपडेट्स
13
स्वत: फुटबॉलपटू असलेली आईच बनली लेकाची कोच आणि म्हणून.. सुनील छेत्रीच्या फुटबॉलप्रेमाची खास गोष्ट!
14
मुलगी हरवल्याप्रकरणी चौकशीसाठी नेलं अन् कोठडीतच तरूणाचा मृत्यू, नेमकं काय झालं?
15
"मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करा, गोहत्या करणाऱ्यांना उलटे लटकवून सरळ करू", अमित शाहांचा इशारा
16
केजरीवाल बाहेर आल्याने सर्वाधिक नुकसान कुणाचं, भाजप की काँग्रेस?; प्रशांत किशोर यांनी 'गणित'च सांगितलं
17
‘CAA ही मोदींची गॅरंटी, कुणीही हटवू शकणार नाही’, आझमगड येथून मोदींनी दिलं आव्हान
18
"यासारखी अमानुष गोष्ट नाही..."; पंतप्रधान मोदींच्या घाटकोपरमधील रोड शो वरून संजय राऊतांचा हल्लाबोल
19
‘मी त्यांच्यासोबत, जर स्वाती मालिवाल यांना वाटलं तर…’ गैरवर्तन प्रकरणी प्रियंका गांधी यांचं मोठं विधान 
20
विकी कौशलची 'ही' इच्छा अजूनही अपूर्णच! म्हणाला, 'कधी करेन माहित नाही पण...'

Rafale Deal Controversy: 'पर्रीकर ब्लॅकमेल करतील, म्हणून मोदी-शहा त्यांचा राजीनामा घेत नाहीत'

By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2018 10:31 AM

Rafale Deal Controversy: काँग्रेसचा मोदी-शहांवर खळबळजनक आरोप

पणजी: मनोहर पर्रीकर यांच्याकडे राफेल डीलबद्दलची महत्त्वाची माहिती असल्यानं त्यांचा राजीनामा घेतला जात नाही, असा खळबळजनक दावा काँग्रेसनं केला आहे. वादग्रस्त राफेल विमान खरेदी कराराबद्दल पर्रीकर यांच्याकडे अतिशय महत्त्वाची माहिती आहे. या माहितीच्या आधारे ते ब्लॅकमेल करु शकतात, अशी भीती पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपा अध्यक्ष अमित शहा यांना वाटते. त्यामुळेच त्यांच्याकडून पर्रीकरांचा राजीनामा घेतला जात नाही, असा गंभीर आरोप गोवा प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी केला. गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्यावर दिल्लीतील एम्स रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यामुळे काही दिवसांपासून गोव्यात नेतृत्त्व बदलाची चर्चा होती. मात्र काल अखेर या चर्चेला पूर्णविराम मिळाला. पर्रीकरच मुख्यमंत्रीपदी कायम राहतील, असं भाजपाकडून जाहीर करण्यात आलं. यानंतर काँग्रेस नेते गिरीश चोडणकर यांनी भाजपावर निशाणा साधला. राफेल डीलबद्दलची महत्त्वपूर्ण माहिती बाहेर येऊ नये, यामुळेच मनोहर पर्रीकरांना मुख्यमंत्रीपदी कायम ठेवण्याचा निर्णय भाजपा नेतृत्त्वानं घेतला आहे, असा गंभीर आरोप चोडणकर यांनी केला. 'ज्यावेळी राफेल विमान खरेदीचा करार झाला, त्यावेळी मनोहर पर्रीकर संरक्षण मंत्रीपदी होते. त्यामुळे त्यांच्याकडे या कराराबद्दलची महत्त्वाची माहिती आहे, असं मला वाटतं. या माहितीच्या आधारे त्यांच्याकडून ब्लॅकमेलिंग केलं जाऊ शकतं. त्यामुळेच मोदी-शहा त्यांना राजीनामा द्या, असं सांगण्याची हिंमत दाखवू शकत नाहीत,' असा गंभीर आणि खळबळजनक आरोप चोडणकर यांनी पत्रकारांशी बोलताना केला. राफेल विमान खरेदीत मोठा घोटाळा झाला असून त्यामध्ये मोदींचा सहभाग आहे, असाही दावा त्यांनी केला. 

टॅग्स :Rafale Dealराफेल डीलNarendra Modiनरेंद्र मोदीManohar Parrikarमनोहर पर्रीकरAmit Shahअमित शाहBJPभाजपा