विधानसभा निवडणुकीत युती कायम राहणार: सुदिन ढवळीकर;  भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांना भेटले

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2026 08:51 IST2026-01-31T08:51:21+5:302026-01-31T08:51:25+5:30

गोव्यातील सध्याची राजकीय परिस्थिती, आगामी विधानसभा निवडणुका, विकासात्मक मुद्दे तसेच युतीतील समन्वय यावर सविस्तर चर्चा झाल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली.

alliance will continue in assembly elections said sudin dhavalikar meet bjp national president nitin nabin | विधानसभा निवडणुकीत युती कायम राहणार: सुदिन ढवळीकर;  भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांना भेटले

विधानसभा निवडणुकीत युती कायम राहणार: सुदिन ढवळीकर;  भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांना भेटले

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी: राज्यातील भाजप आघाडी सरकारमध्ये घटक असलेल्या महाराष्ट्र गोमंतक पक्षाचे नेते तथा वीजमंत्री सुदिन ढवळीकर व आमदार जीत आरोलकर यांनी काल शुक्रवारी गोवा भेटीवर असलेले भाजपचे नवविनियुक्त राष्ट्रीय अध्यक्ष नीतीन नबीन यांची भेट घेतली. या भेटीनंतर, २०२७ च्या विधानसभा निवडणुकीसाठी भाजपसोबतची युती कायम राहील, असे मंत्री ढवळीकर यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले.

बैठकीदरम्यान गोव्यातील सध्याची राजकीय परिस्थिती, आगामी विधानसभा निवडणुका, विकासात्मक मुद्दे तसेच युतीतील समन्वय यावर सविस्तर चर्चा झाल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली. मंत्री ढवळीकर यांनी, भाजप-मगो युतीमुळे गोव्यात स्थिर सरकार शक्य झाले असून, ही युती पुढील काळातही राज्याच्या हितासाठी फायदेशीर ठरेल, असा विश्वास व्यक्त केला.

ते म्हणाले की, भाजप आघाडी सरकारच्या माध्यमातून राज्यात विविध विकासकामांना गती मिळाली असून, सामान्य जनतेच्या प्रश्नांवर सरकार सकारात्मक निर्णय घेत आहे. त्यामुळे २०२७ च्या निवडणुकीतही मगो भाजपसोबत युतीनेच निवडणूक लढवेल.

ढवळीकर यांची भाजप राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांच्याशी झालेली ही भेट राजकीयदृष्ट्या महत्त्वाची मानली जात असून, आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर दोन्ही पक्षांमध्ये समन्वय आणि एकजूट अधिक मजबूत होणार असल्याचे संकेत मिळत आहेत. दरम्यान, अपक्ष आमदार चंद्रकांत शेट्ये, अंतोन वाझ, आलेक्स रेडिनाल्ड यांनीही नबीन यांची भेट घेतली.
 

Web Title : विधानसभा चुनाव में गठबंधन जारी रहेगा: सुदिन ढवलिकर ने भाजपा अध्यक्ष से मुलाकात की

Web Summary : सुदिन ढवलिकर ने भाजपा अध्यक्ष नितिन नबीन से मुलाकात के बाद 2027 के चुनावों के लिए भाजपा-एमजीपी गठबंधन जारी रखने की पुष्टि की। चर्चा में गोवा की राजनीतिक स्थिति, आगामी चुनाव, विकास और समन्वय शामिल थे। ढवलिकर का मानना है कि गठबंधन से स्थिर सरकार सुनिश्चित होगी और राज्य को लाभ होगा।

Web Title : Alliance to Continue in Assembly Elections: Sudin Dhavalikar Meets BJP President

Web Summary : Sudin Dhavalikar affirmed the BJP-MGP alliance will continue for the 2027 elections after meeting BJP President Nitin Nabin. Discussions covered Goa's political situation, upcoming elections, development, and coordination. Dhavalikar believes the alliance ensures a stable government and benefits the state.