पूनम पांडेनंतर आता मिलिंद सोमणचाही गोवा बिचवर न्यूड फोटो, काँग्रेसचा संताप

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2020 16:28 IST2020-11-04T16:24:03+5:302020-11-04T16:28:00+5:30

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी या घटनेवर ट्विट करताना तीव्र नापसंती व्यक्त करताना पूर्वी पांडे आणि आता सोमण यांचे हे कृत्य पाहता गोवा पॉर्न माफियाला आंदण दिला आहे का असा सवाल मुख्यमंत्री प्रमोद सावंत याना केला आहे.

After Poonam Pandey, now Milind Soman also has nude photos on Goa beach | पूनम पांडेनंतर आता मिलिंद सोमणचाही गोवा बिचवर न्यूड फोटो, काँग्रेसचा संताप

पूनम पांडेनंतर आता मिलिंद सोमणचाही गोवा बिचवर न्यूड फोटो, काँग्रेसचा संताप

ठळक मुद्देकाँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी या घटनेवर ट्विट करताना तीव्र नापसंती व्यक्त करताना पूर्वी पांडे आणि आता सोमण यांचे हे कृत्य पाहता गोवा पॉर्न माफियाला आंदण दिला आहे का असा सवाल मुख्यमंत्री प्रमोद सावंत याना केला आहे

मडगाव: पूनम पांडे हिच्या गोव्यात शूट झालेल्या सॉफ्ट पॉर्न व्हिडिओमुळे राज्याची प्रतिमा मालिन झालेली असतानाच सिनेस्टार आणि मॉडेल मिलिंद सोमण याचा गोव्यातील बिचवर विवस्त्र धावतानाचा फोटो त्याच्या इन्स्टाग्रामवर झळकल्याने गोव्याचे नाव पुन्हा एकदा कुचर्चेत आले आहे. मिलिंद सोमण याने आपल्या 55 व्या वाढदिनी हा फोटो इन्स्टाग्रामवर टाकला असून विवस्त्रावस्थेत धावतानाचा फोटो त्याची पत्नी अंकिता कुवर हिने शूट केला आहे.

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी या घटनेवर ट्विट करताना तीव्र नापसंती व्यक्त करताना पूर्वी पांडे आणि आता सोमण यांचे हे कृत्य पाहता गोवा पॉर्न माफियाला आंदण दिला आहे का असा सवाल मुख्यमंत्री प्रमोद सावंत याना केला आहे. बायलांचो एकवोट या महिला संघटनेच्या अध्यक्ष आवदा व्हिएगस यांनी पोलिसांनी या पोस्टची स्वेच्छा दखल घेऊन मिलिंद सोमण याच्यावर गुन्हा नोंद करावा अशी मागणी केली आहे. सार्वजनिक ठिकाणी असे प्रदर्शन करण्यासाठी गोव्यात कुठेही घोषित केलेले ' न्यूड बीच' नाही. भा. दं. सं च्या 292 कलमाखाली हा गुन्हा असल्याचे म्हटले आहे.

गोवा फॉरवर्डच्या महिला आघाडीच्या अध्यक्ष अश्मा सय्यद यांनी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी आतापर्यंत  या अशा प्रकारांची दखल घेऊन कडक कारवाई करण्याची गरज होती. मात्र ते स्वस्थ बसले आहेत ते पाहिल्यास त्यांना गोवा ' पॉर्न डेस्टिनेशन' म्हणून प्रमोट करण्यातच स्वारस्य असावे असे वाटते अशी प्रतिक्रिया व्यक्त केली.

Read in English

Web Title: After Poonam Pandey, now Milind Soman also has nude photos on Goa beach