शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
2
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
3
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
4
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
5
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
6
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
7
बँक ऑफ महाराष्ट्रावर दरोडा, १५ कोटी लुटीचं बिहार कनेक्शन; ५ सशस्त्र गुन्हेगारांनी २० मिनिटांत डाव साधला
8
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
9
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
10
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
11
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
12
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
13
तुम्हालाही रात्री २-३ वाजता अचानक खूप भूक लागते, रोजची सवय की शरीर देतंय धोक्याचा इशारा?
14
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला शेगडी पूजनाची हमी, अन्नपूर्णेच्या आशीर्वादाने धन-धान्य पडणार नाही कमी!
15
IPL Record : विक्रमी सेंच्युरीसह RCB नं रचला इतिहास; MI आणि CSK ला नाही जमलं ते त्यांनी करून दाखवलं
16
परशुराम जयंती २०२६: महेंद्रगिरीवरील भगवान परशुराम मंदिराचा थक्क करणारा इतिहास माहितीय का?
17
हिरव्या जर्सीत कसा आहे RCB चा रेकॉर्ड? विराटसह एकाही भारतीयाला मिळाला नाही 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कार
18
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
19
अक्षय्य तृतीया २०२६: अक्षय्य तृतीयेला 'या' मुहूर्तावर करा शास्त्रोक्त पूजा; धन, धान्य संपत्तीत होईल वाढ!
20
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
Daily Top 2Weekly Top 5

खातेवाटप आज

By admin | Updated: November 15, 2014 02:05 IST

मिकी, आवेर्तानचा शपथविधी : गृह खाते उपमुख्यमंत्र्यांकडे?

पणजी : आमदार मिकी पाशेको व आवेर्तान फुर्तादो या दोघांचाही मंत्री म्हणून शपथविधी शनिवारी दुपारी साडेतीन वाजता काबो राजनिवासावर पार पडणार आहे. त्यानंतर मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांच्याकडून सर्व मंत्र्यांना खात्यांचे वाटप केले जाणार आहे. पाशेको हे चार-पाच वर्षांनंतर पुन्हा एकदा मंत्री बनणार आहेत. त्यांच्या नावावर अनेक गुन्हे नोंद आहेत. यापूर्वी त्यांना एका प्रकरणात अटकही झाली होती व त्यांचे मंत्रिपद गेले होते. त्या वेळी दिगंबर कामत यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसचे आघाडी सरकार अधिकारावर होते. आता पुन्हा एकदा पाशेको यांचा मंत्री म्हणून शपथविधी होत आहे. नावेलीचे आमदार आवेर्तान फुर्तादो यांची प्रतिमा मात्र चांगली असून ते गेली अडीच वर्षे मंत्री होते. त्यांचाही शनिवारी शपथविधी होणार आहे. फुर्तादो यांच्याकडे मच्छीमार व मजूर ही खाती होती. त्यांना आता कोणती खाती दिली जातील, ते स्पष्ट झालेले नाही. आपल्याला कोणते खाते मिळेल, याकडे सर्व मंत्र्यांचे लक्ष आहे. वजनदार खाते मिळविण्यासाठी काही मंत्री प्रयत्नशील आहेत. गृह खाते उपमुख्यमंत्री फ्रान्सिस डिसोझा यांना दिले जाईल, अशीही चर्चा आहे. उपमुख्यमंत्री फ्रान्सिस डिसोझा यांना गृह खाते दिले जाण्याची शक्यता असली, तरी त्यांना अर्थ खाते हवे आहे, असे सूत्रांनी सांगितले. महसूल व नगरविकास ही खाती यापूर्वी डिसोझा यांनी सांभाळली आहेत. मंत्री सुदिन ढवळीकर यांना सार्वजनिक बांधकाम खाते पुन्हा दिले जाईल; पण वाहतूक किंवा नदी परिवहन या दोनपैकी एक खाते भाजपच्या मंत्र्यास दिले जाण्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली. मंत्री दयानंद मांद्रेकर यांच्याकडे आता पुन्हा नागरी पुरवठा खाते दिले जाणार नाही. खाण, नगरनियोजन, अबकारी, अर्थ ही खाती मुख्यमंत्री स्वत:कडे ठेवतील. भाजपचे काही आमदार आपल्याला मंत्रिपद मिळाले नाही म्हणून नाराजी व्यक्त करत आहेत. सभापती राजेंद्र आर्लेकर यांच्यावर पक्षाने अन्याय केला, अशा प्रकारची तीव्र भावना काही आमदारांमध्ये आहे. आर्लेकर, मायकल लोबो, विष्णू वाघ, किरण कांदोळकर, प्रमोद सावंत यांनाही आपल्याला मंत्रिपद मिळावे, असे वाटत होते; पण भाजपने उत्तर गोव्यातील आणखी आमदारांना मंत्रिपद न देता सासष्टीतील ख्रिस्तीधर्मीय बिगर भाजप आमदारांनाच मंत्रिपद देणे पसंत केले आहे. आमदार सावंत यांना साधनसुविधा विकास महामंडळाचे अध्यक्षपद मिळाले आहे. त्यामुळे त्यांची तक्रार नाही. तथापि, वाघ, लोबो आदी आमदार अस्वस्थ आहेत. यापुढे होणाऱ्या विधानसभा अधिवेशनावेळी भाजप आमदारांमधील अस्वस्थता बाहेर येईल, असे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे. (खास प्रतिनिधी)