शहरं
Join us  
Trending Stories
1
सहा देशांमध्ये ९९ हजार टन लाल कांद्याच्या निर्यातीस परवानगी; निर्णय नवा की जुनाच?, याची चर्चा
2
ऐन निवडणुकीत बाजारातील पैसा गायब; अंगडियाचे दर भडकले !
3
अब की बार, देश में जनता की सरकार; महाराष्ट्रात करोडो रुपयांना आमदारांची खरेदी, पक्षांतराचा पायंडा पाडला : प्रियंका गांधी
4
काँग्रेसची सत्ता आली तर ओबींसीचे आरक्षण धर्माच्या नावावर वाटणार : पंतप्रधान मोदी
5
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
6
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
7
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
8
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
9
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
10
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
11
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
12
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
13
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
14
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
15
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
16
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
17
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
18
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
19
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
20
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका

...तर मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारेन- श्रीपाद नाईक

By ऑनलाइन लोकमत | Published: December 09, 2018 3:57 AM

पक्षाने सांगितल्यास गोव्याच्या मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारण्यास तयार असल्याचे केंद्रीय आयुष मंत्रालयाचे राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी स्पष्ट केले.

पुणे : मी पक्षाची शिस्त पाळणारा कार्यकर्ता आहे. आतापर्यंत पक्षाने मला न मागता चार वेळा खासदारकी, मंत्रीपद दिले आहे. पक्षाने सांगितल्यास गोव्याच्या मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारण्यास तयार असल्याचे केंद्रीय आयुष मंत्रालयाचे राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी शनिवारी स्पष्ट केले.सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील आरोग्य सेवांचे उद्घाटन नाईक यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पत्रकारांनी त्यांच्याशी संवाद साधला. गोव्याच्या मुख्यमंत्रीपदासाठी नाईक यांचे नाव चर्चेत आहे, त्याबाबत त्यांना विचारणा करण्यात आली. त्यावेळी त्यांनी पक्ष सांगेल त्या आदेशाचे पालन केले जाईल, असे सांगितले. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात उभारण्यात आलेल्या दंतचिकित्सा सेवा व आपत्कालीन वैद्यकीय सेवांचे उद्घाटन नाईक यांच्या हस्ते झाले. दंतचिकित्सा सेवा लगेच सुरू केल्या. तर आपत्कालीन वैद्यकीय सेवा १ जानेवारी २०१९ पासून उपलब्ध करून दिली जाणार आहेत. त्या विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी अशा सर्वांसाठी उपलब्ध असतील, असे विद्यापीठ प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. यावेळी कुलगुरू नितीन करमळकर, व्यवस्थापन परिषदेचे सदस्य राजेश पांडे, डॉ. सोमनाथ पाटील, प्रसेनजित फडणवीस, महेश आबाळे, रुबी हॉल क्लिनिकचे डॉ. परवेझ ग्रँट, डॉ. जयंत देवपुजारी, वैद्य योगेश बेंडाळे, आरोग्य केंद्राचे समन्वयक डॉ. शशिकांत दूधगावकर उपस्थित होते.सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात विद्यार्थ्यांना तातडीची गरज भासल्यास वैद्यकीय सेवा उपलब्ध व्हाव्यात, यासाठी आरोग्य केंद्र सुसज्ज करण्यात यावे, अशी मागणी विद्यार्थ्यांकडून सातत्याने केली जात होती. त्यासाठी वेळोवेळी आंदोलने करण्यात आली होती. यापार्श्वभूमीवर आरोग्य केंद्रामध्ये मोठ्या प्रमाणात सुधारणा करून सेवांचे विस्तारीकरण करण्यात आले आहे, त्याचे शनिवारी उद्घाटन करण्यात आले.

टॅग्स :goaगोवाChief Ministerमुख्यमंत्रीManohar Parrikarमनोहर पर्रीकरBJPभाजपा