शहरं
Join us  
Trending Stories
1
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शारीरीक संबंध बनवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
2
CBSE 10th Result 2026: CBSE चा दहावीचा निकाल जाहीर; कुठे आणि कसा पाहायचा? वाचा...
3
'आमची मोहीम अजून संपलेली नाही'; इराणला मोसादचा थेट इशारा, इस्रायली गुप्तचर संस्थेच्या विधानाने खळबळ
4
Mamata Banerjee : दीदी संतापल्या! "हिंमत असेल तर रोज माझी कार तपासा"; ममता बॅनर्जींचं निवडणूक आयोगाला चॅलेंज
5
सोन्याच्या बाजारात मोठी खळबळ: रशिया, तुर्कीसह बड्या देशांकडून सोन्याची धडाधड विक्री; नेमकं कारण काय?
6
"तुम्ही ममतांचा हिशोब करा, आम्ही गुंडांना उलटे टांगून सरळ करू!"; पश्चिम बंगालमध्ये अमित शाह कडाडले
7
Latest Marathi News LIVE Updates: US-इराण यांच्यातील युद्धविराम आणखी २ आठवडे वाढण्याची शक्यता, पुन्हा होणार चर्चा?
8
छुप्या युतीचा पर्दाफाश? इराणचे सॅटेलाइटच्या मदतीनं अमेरिकन ठिकाणांवर हल्ले! या देशानं केला मोठा खेला?
9
एअर इंडियाला २२,००० कोटींचा ऐतिहासिक तोटा; टाटा समूह आणि सिंगापूर एअरलाईन्सकडे आपत्कालीन निधीची मागणी
10
Travel : नकाशावर छोट्या थेंबासारखा दिसतो 'हा' देश, पण आत दडलंय अथांग सौंदर्य! रामायणाशी आहे कनेक्शन
11
IPL 2026 : निक्कीचा 'निकम्मा' शो! LSG च्या २१ कोटींच्या फलंदाजाच्या खात्यात फक्त ४१ धावा
12
रोज खेळायची, मोबाईल पाहायची... १०वीच्या टॉपरने सांगितले कसे मिळाले ५०० पैकी ४९९ गुण?
13
चीनचा टँकर होर्मुझमधून बाहेर पडण्यासाठी निघाला, अमेरिकेच्या युद्धनौका पाहताच माघारी फिरला...
14
Ashok Mittal: राघव चड्डांना हटवून ज्यांना बनवले राज्यसभा उपनेता, त्याच नेत्याच्या मालमत्तांवर ईडीच्या धाडी
15
Mental Health: तुला OCD आहे का?' – असं कोणालाही गमतीने म्हणण्यापूर्वी हा लेख नक्की वाचा!
16
Share Market Update: ₹९ लाख कोटींची लॉटरी! ट्रम्प यांच्या वक्तव्यानंतर शेअर बाजारात तेजी; Sensex १२६४ अंकांनी वधारला
17
कोण आहे 'ही' महिला पत्रकार जिला खुद्द अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कॉल केला? म्हणाले.. 
18
आभासी दुनियेतील गर्लफ्रेंडनं दिला धोका; AI च्या प्रेमात युवकानं उचललं टोकाचं पाऊल, काय घडलं?
19
याला म्हणतात नशीब! ९ नेते दुसऱ्या पक्षांमधून भाजपात आले; काही मुख्यमंत्री, काही उपमुख्यमंत्री बनले
20
५९१ कोटींचा तोटा; ३१ पैकी ८ विभाग नफ्यात, STचा तोटा कमी करण्यासाठी उपाययोजना करायचे निर्देश
Daily Top 2Weekly Top 5

बायणा येथील ७० घरे जमीनदोस्त

By admin | Updated: July 12, 2014 01:45 IST

वास्को : दक्षिण गोवा जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशानुसार बायणा समुद्रकिनाऱ्यावरील सुमारे ७० हून अधिक घरे जमिनदोस्त करण्यात आली़

वास्को : दक्षिण गोवा जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशानुसार बायणा समुद्रकिनाऱ्यावरील सुमारे ७० हून अधिक घरे जमिनदोस्त करण्यात आली़ या वेळी एका व्यक्तीने मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाकडून स्थगिती आदेश मिळविल्याने घरे पाडण्याचे काम थांबवावे लागले़ त्यामुळे ५० हून अधिक घरमालकांना तात्पुरता दिलासा मिळालेला आहे़ शुक्रवारी करण्यात आलेली ही कारवाई लवकर पूर्ण करण्यासाठी २०० पोलिसांचा फौजफाटाही तैनात करण्यात आला होता़ ही घरे वाचविण्यासाठी गोवा खंडपीठात कोणीतरी याचिका सादर करून स्थगिती मिळण्याची शक्यता असल्याने स्थगिती आदेश घेण्यापूर्वी जास्तीत जास्त घरे पाडण्यात यावी यासाठी सरकारने सकाळी ८ वा. कारवाईला सुरुवात करण्यात आली़ बायणा किनाऱ्याजवळची बांधकामे भरती रेषेपर्यंत आल्याने जिल्हाधिकारी फुर्तादो यांनी ही बांधकामे २४ तासांच्या आत खाली करण्याचे आदेश दिले होते; परंतु तेथील नागरिकांनी २४ वर्षांपेक्षा अधिक काळापासून वास्तव्य करत असल्याचा दावा करून घरे खाली करण्यास नकार दिल्यामुळे ही करावाई करण्यात आली़ पहाटे सात वाजल्यापासून पोलीस अधिकारी संपूर्ण पोलिसांसह घटनास्थळी दाखल झाले़ सकाळी ८ वा. मामलेदार लक्ष्मीकांत देसाई यांनी ध्वनिक्षेपकावरून घरमालकांना आवाहन करत चिखली मैदान, टिळक मैदान व कुठ्ठाळी गोदामामध्ये पुनर्वसनाची व्यवस्था केल्याचे सांगितले़ तसेच त्यासाठी बसेसची व्यवस्था करण्यात आल्याची सूचनाही त्यांनी केली़ यावेळी कोणीही जाण्यास तयार नसल्याचे पाहून ९ वाजता जेसीबीच्या साहाय्याने बायणा शौचालयाकडून कारवाई सुरू केली़ या वेळी उपजिल्हाधिकारी गौरीश शंखवाळकर, उपअधीक्षक लॉरेन्स डिसोझा, निरीक्षक सागर एकोस्कर, निरीक्षक संतोष देसाई, वेर्णाचे निरीक्षक विश्वेश कर्पे, रवी देसाई, राम आसरे, राजू राऊत देसाई तसेच पोलीस उपस्थित होते़ सार्वजनिक बांधकाम खाते, वीज खाते व पालिका कर्मचारी यांनी कारवाईमध्ये भाग घेतला़ दरम्यान, येथील नागरिक यमनप्पा मदार यांनी अ‍ॅड़ यमन सौझा यांच्या सहकार्याने गोवा खंडपीठात धाव घेऊन ११़३०च्या सुमारास स्थगिती मिळवली़ त्यानंतर ही कारवाई रोखण्यात आली़ जिल्हाधिकऱ्यांनी न्यायालयाच्या आदेशानुसार कारवाई बुधवारपर्यंत स्थगित केली आहे़ त्यामुळे ६ बांधकामे व एक यल्लमा देवीचे मंदिर कारवाईपासून बचावले़ (प्रतिनिधी)