शहरं
Join us  
Trending Stories
1
Heatwave: तिकडे अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’, इकडे सांगलीमध्ये गारांसह वादळी पाऊस!
2
Tamil Nadu Explosion: तामिळनाडूतील फटाका कारखान्यात भीषण स्फोट; २३ जण ठार, अनेक गंभीर जखमी
3
आजचे राशीभविष्य, २० एप्रिल २०२६: कार्यात यश, स्वादिष्ट भोजन; काहीसा वेगळा दिवस
4
Akshay Tritiya: अक्षय्य मुहूर्तावर १ हजार कोटींची सुवर्णझळाळी
5
नाश्त्यावरून वाद, कार्यकर्त्यांसमोरच नगरसेविकेने जिल्हाध्यक्षांना लगावली कानशिलात!
6
Middle East War: करार करा अन्यथा तुमचा विनाश अटळ; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
Drugs Racket: टिटवाळ्याच्या आलिशान घरातून ‘ती’ मुंबईत चालवत होती ड्रग्ज रॅकेट!
8
शांती चर्चेला खो! इराणने अमेरिकेसमोर अ़डवली गाडी; होर्मुझचा अडथळा दूर झाल्याशिवाय चर्चाच नाही!
9
लेख: तहान लागल्यावर विहीर खोदायची, तर कोरड पडणारच !
10
आजचा आग्रलेख: विमान सुरक्षेचे पंख वाऱ्यावर, प्रवाशांचा जीव टांगणीला!
11
विशेष लेख: उपकार नव्हेत, हा महिलांचा हक्क आहे!
12
IPL 2026 : पंतच्या LSG ला पराभूत करत Punjab Kings नं रचला इतिहास; १९ वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं
13
Bigg Boss Marathi 6 Winner: अंदाज खरा ठरला! तन्वी कोलतेने पटकावली 'बिग बॉस मराठी ६'ची ट्रॉफी; राकेश बापट उपविजेता
14
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
15
उरुळी कांचनमध्ये अल्पवयीनावर लैंगिक अत्याचार; ग्राफिक्स व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा
16
Tanvi Kolte: 'बिग बॉस मराठी ६'ची विजेती तन्वी कोलतेचं घराबाहेर जाताना मोठं विधान, म्हणाली- "मी आता एक ब्रँड म्हणून..."
17
एडन मार्करम ते अभिषेक शर्मा! IPL इतिहासात एका षटकात ५ षटकार खाणारे ७ गोलंदाज
18
Video: "घुसखोर निघाला ना, तर तुला इथूनच उचलून घेऊन जाईन", म्हाडाचे उपाध्यक्ष IAS संजीव जयस्वाल यांची रहिवाशाला दमबाजी; व्हिडीओ व्हायरल
19
चाकूर हादरले; गायब दोघा चिमुकल्या भावंडांपैकी एकाचा मृतदेहच आढळला!
20
Bigg Boss Marathi 6: अनुश्री माने गेली घराबाहेर! 'बिग बॉस मराठी ६'चा प्रवास संपला, विशाल रडला
Daily Top 2Weekly Top 5

इफ्फीच्या उद्घाटनास ५ हजार आसन व्यवस्था

By admin | Updated: November 17, 2014 02:00 IST

मिलिंद नाईक यांनी घेतला तयारीचा आढावा

पणजी : इफ्फीच्या तयारीला वेग आला असून माहिती व प्रसिद्धी खात्याचे मंत्री मिलिंद नाईक यांनी रविवारी अधिकाऱ्यांसह ताळगाव येथील श्यामाप्रसाद मुखर्जी स्टेडियमला भेट देऊन कामाचा आढावा घेतला. स्टेडियमवर लाकडी प्लॅटफॉर्म तयार करून तेथेही खुर्च्या घातल्या जाणार असून किमान ५ हजार प्रेक्षक बसू शकतील, अशी व्यवस्था असणार आहे. मंत्री नाईक यांनी ही माहिती पाहणी केल्यानंतर ‘लोकमत’ला दिली. एरव्ही इफ्फीच्या उद्घाटनासाठी कांपाल येथे बांदोडकर फुटबॉल मैदानावर मोठा शामियाना घातला जात असे. गेल्या वर्षी त्यावर साडेचार कोटी रुपये खर्च आला होता व केवळ ३ हजार प्रेक्षकांची बसण्याची व्यवस्था झाली होती. या वर्षी उद्घाटन व समारोप सोहळा श्यामाप्रसाद स्टेडियमवर होणार आहे. त्यामुळे शामियान्याचा खर्च वाचणार तर आहेच, शिवाय अन्य बाबतीतही काटकसर केली जात असल्याने यंदा खर्च थोडा कमी होईल, असा दावा नाईक यांनी केला. आयनॉक्स, कला अकादमी तसेच मनोरंजन संस्थेच्या कार्यालयालाही नाईक यांनी भेट देऊन पाहणी केली. मंगळवारी १८ रोजी पुन्हा भेट देऊन कामाचा अंतिम आढावा ते घेणार आहेत. सर्व कामे वेळेत पूर्ण होणार असल्याचा दावाही त्यांनी केला. इफ्फीत सुपरस्टार अमिताभ बच्चन आणि रजनीकांत उपस्थिती लावणार असल्याचे त्यांनी सांगितले. या वेळी माहिती खात्याचे सचिव पवनकुमार सेन, संचालक अरविंद बुगडे, मनोरंजन संस्थेचे उपाध्यक्ष दामू नाईक उपस्थित होते. (प्रतिनिधी)