५ वर्षीय मुलीवर वास्कोत बलात्कार

By Admin | Updated: June 21, 2015 02:36 IST2015-06-21T02:35:47+5:302015-06-21T02:36:12+5:30

वास्को : नवेवाडे येथे पाच वर्षीय मुलीचा विनयभंग आणि बलात्कार केल्याप्रकरणी वास्को पोलिसांनी नवेवाडे येथील कन्सेप्शन अ‍ॅण्ड्र्यू फर्नांडिस या ४० वर्षीय व्यक्तीस अटक केली आहे.

5 year old girl raped by Vascoit | ५ वर्षीय मुलीवर वास्कोत बलात्कार

५ वर्षीय मुलीवर वास्कोत बलात्कार

वास्को : नवेवाडे येथे पाच वर्षीय मुलीचा विनयभंग आणि बलात्कार केल्याप्रकरणी वास्को पोलिसांनी नवेवाडे येथील कन्सेप्शन अ‍ॅण्ड्र्यू फर्नांडिस या ४० वर्षीय व्यक्तीस अटक केली आहे.
वास्को पोलीस स्थानकाचे उपनिरीक्षक जॉन फर्नांडिस यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी आपल्या वृद्ध आजीबरोबर राहात होती. आरोपी कन्सेप्शन फर्नांडिस हा अधूनमधून या मुलीच्या घरी येत होता. तिच्याशी खेळण्याचे नाटक करून तिचा विनयभंगही करायचा. खेळण्याच्या बहाण्याने त्याने तिच्यावर काही वेळा शारीरिक अत्याचारही केले होते.
काही दिवसांपूर्वी ही मुलगी आपल्या आजीच्या (वडिलांची आई) घरी आली असता, तिच्यावर शारीरिक अत्याचार केल्याचे उघड झाले. त्यानंतर मुलीच्या पालकांनी वास्को पोलीस स्थानकात येऊन कन्सेप्शन याच्याविरुद्ध तक्रार नोंदविली. या तक्रारीनुसार वास्को पोलिसांनी कन्सेप्शन फर्नांडिस याच्यावर गुन्हा नोंदवून त्याला अटक केली. उपनिरीक्षक जॉन फर्नांडिस पुढील चौकशी करत आहेत. (प्रतिनिधी)

Web Title: 5 year old girl raped by Vascoit