बाल लैंगिक शाेषणाचे साहित्य बाळगल्याप्रकरणी ५ जणांना अटक; "ओपरेशन सुरक्षा"अंतर्गत गोवा पोलिसांनी कारवाई
By पूजा प्रभूगावकर | Updated: July 28, 2023 16:36 IST2023-07-28T16:34:16+5:302023-07-28T16:36:22+5:30
बाल लैंगिक शोषणाचे साहित्य बाळगणे तसेच ते प्रसारीत (सीएसएएम) केल्याप्रकरणी पाच जणांना अटक करुन गुन्ह्याचा पर्दाफाश केला आहे.

बाल लैंगिक शाेषणाचे साहित्य बाळगल्याप्रकरणी ५ जणांना अटक; "ओपरेशन सुरक्षा"अंतर्गत गोवा पोलिसांनी कारवाई
पणजी - गोवापोलिसांनी "ओपरेशन सुरक्षा"अंतर्गत बाल लैंगिक शोषणाचे साहित्य बाळगणे तसेच ते प्रसारीत (सीएसएएम) केल्याप्रकरणी पाच जणांना अटक करुन गुन्ह्याचा पर्दाफाश केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी सलमान खान (२०,चिंबल, मुळ मध्यप्रदेश),महेंद्र सिंह (२७,बेती, मुळ उत्तर प्रदेश),लेमन ईस्लाम (२४, कळंगुट, पश्चिम बंगाल), प्रणीत लोलयेंकर (२४,दवर्ली) व नितीन रेडकर (२३,कळंगुट, मुळ सिंधुदुर्ग) यांचा समावेश आहे.
पोलिस निरीक्षक देवेंद्र पिंगळे यांच्या नेतृत्वाखाली सायबर गुन्हे विभाग, पोलिस निरीक्षक नारायण चिमुलकर, निरीक्षक दत्ताराम राऊत व निरीक्षक विकास देयकर यांच्या नेतृत्वाखाली गुन्हा अन्वेषण विभाग,आयपीएस अधिकारी सचिन यादव, आयपीएस अधिकारी नितीन यादव व पर्वरी पोलिस निरीक्षक अनंत गावकर यांच्या नेतृवाखाली उत्तर गोवा पोलिस पथक, तर आयपीएस अधिकारी विकास स्वामी व मायणा कुडतरी पोलिस निरीक्षक अरुण देसाई यांच्या नेतृवाखाली दक्षिण गोवा पोलिस पथकाने ही कारवाई केली.