शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
2
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
3
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
4
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
5
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
6
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
7
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
8
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
9
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
10
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
11
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
12
Chanakya Niti: शून्यातून विश्व निर्माण करायचंय? आचार्य चाणक्यांचे 'हे' १० विचार तुम्हाला नक्कीच दिशा देतील
13
९० दिवसांत २८ मृत्यू, मग पुजाऱ्याने दिला 'असा' सल्ला, संपूर्ण गाव झाला रिकामी, आता...  
14
काँग्रेस नेते राजेंद्र भारती यांची आमदारकी रद्द! २७ वर्षांपूर्वीचे प्रकरण काय, ज्यामुळे गमावले विधानसभा सदस्यत्व?
15
FASTag Annual Pass: "पैसे वाया घालवू नका! 'या' हायवेवर आता FASTag वार्षिक पास चालणार नाही; नवीन यादी जाहीर
16
आई वडिलांना न सांभाळणाऱ्या कर्मचाऱ्यांची खैर नाही; १५% पगार कापणार, तेलंगणा सरकारचा निर्णय
17
पगार झाला की खिशाला 'कात्री'? महिनाअखेरची ओढताण टाळण्यासाठी 'हे' ५ आर्थिक मंत्र नक्की पाळा
18
PSL 2026: भर मैदानात डेव्हिड वॉर्नर- मोईन अली यांच्यात तू-तू मैं-मैं; व्हिडीओ व्हायरल, नेमकं काय घडलं?
19
होर्मुझच्या 'टोलनाक्या'वरच अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक! इराणच्या केशम बेटावर दणादण बॉम्बवर्षाव; सॅटेलाईट फोटोंनी फुटले भांडे
20
"मी झोपलेले, तो माझ्या खोलीत आला"; अब्रू वाचवण्यासाठी अभिनेत्रीने इमारतीतून मारली उडी
Daily Top 2Weekly Top 5

दुकानाला लागलेल्या आगीत सुमारे 40 लाखाचे नुकसान

By आप्पा बुवा | Updated: June 7, 2023 19:09 IST

रात्री 11 वाजण्याच्या दरम्यान आगीवर संपूर्णपणे नियंत्रण ठेवण्यात अग्निशामक दलाला यश आले.

अप्पा बुवा / फोंडा- मंगळवारी येथील आचल टेक्सटाईल या दुकानाला लागलेल्या आगीत दुकानातील सर्व सामान बेचिराख झाले असून अग्निशामक दलाचे अधिकारी सुशील मोरजकर यांनी वर्तवलेल्या अंदाजानुसार किमान 40 लाखाचे नुकसान झाले आहे. योग्य ते मूल्यमापन झाल्यानंतर निश्चित नुकसान कळून येईल. 

मंगळवारी रात्री 11 वाजण्याच्या दरम्यान आगीवर संपूर्णपणे नियंत्रण ठेवण्यात अग्निशामक दलाला यश आले. सदरची आग  विझविण्यासाठी एकूण पाच पाण्याचे बंब वापरण्यात आले आहेत. आगीत भस्मसात झालेल्या दुकानाच्या वर असलेले आणखीन एक कपड्याचे दुकान, त्याचबरोबर हॉटेल मिनिनोला सुद्धा या आगीची झळ पोचलेली आहे. आगीचे परिणाम त्यांच्या भिंतीवर स्पष्टपणे जाणवत आहेत. आग लागल्यानंतर पहिल्या मजल्यावरील कापड दुकानदाराने वेळीच दुकान बंद केल्याने पुढील अनर्थ टाळता आला.

अग्नीरोधक यंत्र का नाही?कोणत्याही दुकानाला परवानगी देताना किंवा व्यवसायिक आस्थापनाला परवानगी देताना किमान काही अग्निरोधक सामग्री असणे गरजेचे असते. आज ज्यावेळी  अग्निशामक दलाचे अधिकारी सुशील मोरजकर यांच्याबरोबर दुकानाची पाहणी केली असता कुठेच अग्निरोधक सामग्री आढळून आली नाही. मात्र इमारतीच्या मागच्या बाजूला  आग्निरोधक   दोन सिलेंडर बसवण्यात आलेले आढळले. दुकान पुढे असताना दुकानाच्या मागे अग्नारोधक सिलेंडर कशाला  असा प्रश्न आता निर्माण होत आहे.

युवकांनी केली मदत दुकानाला आग लागली तेव्हा आत मोठ्या प्रमाणावर नवीन कपड्या चा स्टॉक होता. आग रौद्र रुप धारण करत असल्याचे लक्षात येताच स्थानिक युवकांनी पुढाकार घेतला व काही सामान व माल वाचवणे ह्या संदर्भात चांगली कामगिरी बजावली. जे काही कपडे काढता येईल ते काढण्यासाठी युवकांनी यावेळी चांगलीच मदत केली.

टॅग्स :goaगोवाfireआग